कोरोनाच्या नावाखाली आम्हाला घाबरविण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण देशभर लॉकडाऊन लागला तरी आमचे आंदोलन संपविणार नाही, असा इशारा शेतकरी नेते राकेश टिकैैत यांनी दिला आहे. Our movement will continue even after the lockdown rakesh tikait
विशेष प्रतिनिधी
सहारनपूर : कोरोनाच्या नावाखाली आम्हाला घाबरविण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण देशभर लॉकडाऊन लागला तरी आमचे आंदोलन संपविणार नाही, असा इशारा शेतकरी नेते राकेश टिकैैत यांनी दिला आहे.
सहारनपूरमध्ये बोलताना टिकैैत म्हणाले, कोरोनाच्या नावावर शेतकऱ्यांना घाबरवणं सरकारने बंद करावे. शेतकरी आंदोलन म्हणजे काही शाहीनबाग नाही, जे कोविडच्या नावावर संपवता येईल. देशात कर्फ्यू लागलेला असेल किंवा लॉकडाऊन, शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच राहील. नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याची आमची तयारी आहे
दिल्लीमध्ये सध्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. याठिकाणी रुग्णालयांमध्ये बेडही शिल्लक नाहीत. तरीही शेतकरी आपल्या आंदोलनावर कायम आहेत. दिल्लीतील नागरिकांनी या परिस्थितीत शेतकऱ्यांच्या आंदोलनावर संताप व्यक्त केला आहे. केंद्र सरकारही दिल्लीमध्ये लॉकडाऊन लावण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर टिकैैत यांनी आपले आंदोलन सुरूच राहणार असल्याचे म्हटले आहे.
राजस्थानातील अलवर जिल्ह्यात आपल्यावर जो हल्ला झाला तो भाजपच्याच गुंडांनी केल्याचा आरोप करत टिकैैत म्हणाले, या प्रकरणात आपण कोणतीही कारवाई करणार नाही.
इतर बातम्या वाचा…
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App