तृणमूल नेत्याच्या घरात सापडले EVM आणि VVPAT, निवडणूक आयोगाने अधिकाऱ्याला केले निलंबित

EVM and VVPAT found in Trinamool leader's house, Election Commission suspended the officer

EVM and VVPAT found in Trinamool leader’s house : पश्चिम बंगालमधील तिसर्‍या टप्प्यातील मतदानादरम्यान मंगळवारी उलुबेरिया येथे टीएमसी नेत्याच्या घरातून इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आणि व्हीव्हीपॅट स्लिप्स जप्त करण्यात आल्या. वृत्तसंस्था एएनआयने निवडणूक आयोगाच्या हवाल्याने असे सांगितले आहे की, क्षेत्र अधिकारी तपन सरकार यांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट्स घेऊन टीएमसी नेत्याच्या घरी भेट दिली होती. EVM and VVPAT found in Trinamool leader’s house, Election Commission suspended the officer


विशेष प्रतिनिधी

हावडा : पश्चिम बंगालमधील तिसर्‍या टप्प्यातील मतदानादरम्यान मंगळवारी उलुबेरिया येथे टीएमसी नेत्याच्या घरातून इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आणि व्हीव्हीपॅट स्लिप्स जप्त करण्यात आल्या. वृत्तसंस्था एएनआयने निवडणूक आयोगाच्या हवाल्याने असे सांगितले आहे की, क्षेत्र अधिकारी तपन सरकार यांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट्स घेऊन टीएमसी नेत्याच्या घरी भेट दिली होती. ही बाब उघडकीस आल्यानंतर त्या अधिकाऱ्याला आयोगाने निलंबित केले असून ईव्हीएम मशीनला मतदान प्रक्रियेमधून वगळण्यात आले आहे. हावडाच्या उलुबेरिया उत्तर जागेच्या सेक्टर 17 चे अधिकारी म्हणून तैनात असलेले तपन सरकार ईव्हीएम व व्हीव्हीपॅट घेऊन तृणमूल नेत्याच्या घरी गेले होते, महत्त्वाची बाब म्हणजे हे नेते त्यांचे नातेवाईक आहेत.

तृणमूल नेता निवडणूक अधिकाऱ्याचा नातेवाईक

मिळालेल्या माहितीनुसार, तपन सरकार रात्री टीएमसी नेत्याच्या घरी झोपले होते. तपन सरकार यांच्या या कृत्याला आयोगाने मार्गदर्शक सूचनांचे घोर उल्लंघन मानले आहे. ही बाब उघडकीस आल्यानंतर आयोगाने तपन सरकारला तातडीने निलंबित केले असून त्यांच्यावर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, 1 एप्रिल रोजी झालेल्या पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये दुसर्‍या टप्प्यातील मतदानापूर्वी वाद झाला होता. प्रत्यक्षात, आसाममधील करीमगंजमध्ये भाजपच्या उमेदवाराच्या कारमध्ये ईव्हीएम आढळले होते, मतदानानंतर ते स्ट्रॉंगरूममध्ये नेण्यात येत होते. त्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर आयोगाने यासाठी जबाबदार असलेल्या निवडणूक प्रक्रियेशी संबंधित 4 अधिकाऱ्यांना निलंबित केले होते.

तृणमूल नेत्याच्या घराबाहेर जमाव, पोलिसांनी परिस्थिती हाताळली

पश्चिम बंगालमध्ये तिसर्‍या फेरीतील 31 जागांवर मतदान सुरू आहे. या जागा हावडा, हुगळी आणि दक्षिण 24 परगनातील आहेत. निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, सेक्टर अधिकारी टीएमसी नेत्याच्या घरी झोपायला गेले होते, जे त्यांचे नातेवाईक समोर आले आहे. त्यांच्यासोबत ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट होते. टीएमसी नेत्याच्या घरी ईव्हीएम मिळाल्यानंतर ग्रामस्थ घराबाहेर जमले आणि निदर्शने करण्यास सुरुवात केली. यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी जमावाला हटवले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.

EVM and VVPAT found in Trinamool leader’s house, Election Commission suspended the officer

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती