BJP Foundation Day Amit Shah-JP Nadda Wishes Party workers, PM Modi will address

BJP Foundation Day : अमित शाह-जेपी नड्डा यांनी कार्यकर्त्यांचे केले अभिनंदन, पंतप्रधान मोदी करणार संबोधित

भाजप आज देशभरात आपला स्थापना दिन साजरा करत आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा दिल्ली येथील पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित करतील. स्थापना दिनानिमित्त गृहमंत्री अमित शहा आणि जेपी नड्डा यांनीही ट्विट करून कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे. BJP Foundation Day Amit Shah-JP Nadda Wishes Party workers, PM Modi will address


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भाजप आज देशभरात आपला स्थापना दिन साजरा करत आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा दिल्ली येथील पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित करतील. स्थापना दिनानिमित्त गृहमंत्री अमित शहा आणि जेपी नड्डा यांनीही ट्विट करून कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे.

शाह म्हणाले, पीएम मोदी यांच्या नेतृत्वात देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी भाजप प्रयत्नशील

अमित शहा यांनी ट्विट केले की, “स्थापना दिनाच्या भाजपा कार्यकर्त्यांना शुभेच्छा. आपले रक्त-घामाचे सिंचन करून भाजपला एक विशाल वटवृक्ष बनवणाऱ्या सर्व महापुरुषांना मी नमन करतो. राष्ट्रवादी विचारसरणी, अंत्योदयाचे सिद्धांत आणि मोदीजी यांच्या नेतृत्वात देशाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी भाजपा सतत प्रयत्नशील आहे.”

नड्डा म्हणाले, भाजप सदस्यांसाठी पक्ष हाच परिवार

जेपी नड्डा यांनी ट्वीट केले की, “भाजपच्या स्थापना दिनानिमित्त मी संघटनेच्या सर्व महान पुरुषांना नमन करतो, ज्यांनी आपले सर्वस्व देऊन पक्षाला या वैभवापर्यंत नेले आहे. भाजप ही अशी संस्था आहे, जिच्या सदस्यांसाठी पक्षच परिवार आहे.”

नड्डा पुढे म्हणाले, “कोट्यवधी कार्यकर्त्यांची तपश्चर्या आणि सतत मेहनतीमुळे संस्थेच्या विकासाचा आणि राजकीय वैभवाचा प्रवास शक्य झाला आहे.” अंत्योदयाला आपला मूळमंत्र मानून राष्ट्रसेवेत समर्पित पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता आमच्या संघटनेचा पाया आहे.”

दुसर्‍या ट्वीटमध्ये नड्डा म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या भारताची दृष्टी मिळवण्यासाठी आम्हाला ‘सबका साथ, सबका विकास – सबका विश्वास’ हा मंत्र जगून ‘सेवा हीच संघटने’च्या माध्यमातून ते सिद्ध करण्याची गरज आहे. सर्व कार्यकर्त्यांना भाजपच्या स्थापना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.”

BJP Foundation Day Amit Shah-JP Nadda Wishes Party workers, PM Modi will address

महत्त्वाच्या बातम्या

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*