केवळ अदानी -अंबानीच नव्हे तर लाखो कुटुंबे होताहेत श्रीमंत, देशात सव्वा चार लाख नवे कोट्याधिश


विविध आर्थिक संस्थांच्या अहवालांमध्ये गौतम अडानी, मुकेश अंबानी यासारख्या उद्योगपतींच्या संपत्तीत वाढ झाल्याचे दिसत आहे. यामुळे केवळ उद्योगपतीच श्रीमंत होत असल्याची टीका करणाºयांच्या डोळ्यात हुरून इंडियाच्या अहवालाने अंजन घातले आहे. देशातील ६.३३ लाख कुटुंबांनी गरीबीची रेषा पार करून मध्यमवर्गात प्रवेश केला आहे. तर सव्वा चार लाख नवे कोट्याधिश बनले आहेत.Not only Adani-Ambani, but millions of families are getting rich, a 4.25 million new billionaires in the country


विशेष प्रतिनिधी

मुंबई : विविध आर्थिक संस्थांच्या अहवालांमध्ये गौतम अडानी, मुकेश अंबानी यासारख्या उद्योगपतींच्या संपत्तीत वाढ झाल्याचे दिसत आहे. यामुळे केवळ उद्योगपतीच श्रीमंत होत असल्याची टीका करणाºयांच्या डोळ्यात हुरून इंडियाच्या अहवालाने अंजन घातले आहे.

देशातील ६.३३ लाख कुटुंबांनी गरीबीची रेषा पार करून मध्यमवर्गात प्रवेश केला आहे. तर सव्वा चार लाख नवे कोट्याधिश बनले आहेत.हुरुन इंडियाच्या वेल्थ रिपोर्ट २०२० नुसार, कोरोनाची साथ आणि त्यामुळे केलेला लॉकडाऊन असतानाही देशात ४.१२ लाख नवीन कोट्यधीश आणि ६.३३ लाख नवीन मध्यमवर्गीय कुटुंबे वाढली आहेत. नव्या कोट्यधीशांमध्ये ३००० कुटुंबे अशी होती, ज्यांची नेटवर्थ १००० कोटी रुपयांपेक्षा जास्त होती.

ते सुपर रिचच्या श्रेणीत समाविष्ट झाले. नवीन मध्यमवर्गीय कुटुंबांकडे आपले घर आणि महाग वाहनेही होती. सामान्य मध्यमवगीर्यांची संख्या ५.६४ कोटी आहे. त्यांची वार्षिक कमाई अडीच लाख रुपये आहे. १६,९३३ कोट्यधीशांसह मुंबई सर्वात श्रीमंत शहर ठरले आहे.

कोरोनाच्या साथीनंतर देशात लॉकडाऊन लावण्यात आला. यामुळे अर्थव्यवस्थेवर मंदीचे मळभ आले होते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशासाठी २० लाख कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले. लघुउद्योगांना सवलती दिल्या.

आत्मनिर्भर भारत योजनेचा नारा देत भारतीय कंपन्यांना अनेक वस्तूंच्या उत्पादनात प्राधान्य दिले. त्याचा सकारात्मक परिणाम अर्थव्यवस्थेवर झाला आहे. त्यामुळेच मध्यमवर्गीय आणि श्रीमंत कुटुंबांची संख्या वाढली आहे.

मुंबईत १६,९३३ कोट्यधीश कुटुंबे आहेत, त्यांचा देशाच्या जीडीपीत ६.१६ टक्के वाटा आहे. १६ हजार कोट्यधीशांसह नवी दिल्ली दुसºया आणि कोलकाता १० हजार कोट्यधीशांसह तिसºया स्थानी आहे. ५६ हजार श्रीमंतांसह महाराष्ट्र अव्वल आहे. त्यानंतर उत्तर प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक आणि गुजरातचा क्रमांक आहे.

हुरून इंडियाच्या रिपोर्टनुसार २०१९ च्या तुलनेत ७२ टक्के लोक आता व्यक्तिगत व व्यावसायिक जीवनातही खुश आहेत. त्यांच्यासाठी नेहमीप्रमाणे रिअल इस्टेट आणि शेअर बाजार गुंतवणुकीसाठी सर्वात चांगले साधन ठरले. परदेश प्रवासासाठी स्वित्झर्लंड, अमेरिकेनंतर ब्रिटनला पसंती मिळाली. गुंतवणुकीसाठी सिंगापूर आणि यूएईनंतर अमेरिकेलाच सर्वांची पसंती होती. विदेशात शिक्षणाबाबतही अमेरिकेला सर्वांची पसंती आहे.

Not only Adani-Ambani, but millions of families are getting rich, a 4.25 million new billionaires in the country

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती