निवडणूक वर्षात भरघोस पगारवाढीची आशा कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांत!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली :  निवडणूक वर्षात भरघोस पगारवाढीची आशा कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांत!!, असे चित्र फेब्रुवारीच्या अखेरीस दिसू लागले आहे. देशभरातल्या खासगी क्षेत्रातील संघटित आणि असंघटित कामगारांना पगारवाढीची आशा लागून राहिली आहे. In the eyes of the employees, the hope of a huge salary increase in the election year

निवडणूक वर्ष आले की कुठल्याही सरकार महागाई आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न करते. त्याचबरोबर सरकारी आणि खाजगी क्षेत्रात कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी पगारवाढीचे गिफ्टही देते. जागतिक आणि देशांतर्गत अर्थव्यवस्थेचा विचार करूनच पगारवाढ केली जाते हे जरी खरे असले, तरी निवडणूक वर्षांमध्ये सरकार हात सैल ठेवते, असा आत्तापर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना भरघोस पगारवाढीची आशा लागली आहे.

सोशल मीडियावर सध्या काही रील सातत्यानं ट्रेंड होत आहेत. हे रील आहेत पगारवाढ, Appraisals आणि नोकरीच्या ठिकाणी असणाऱ्या वातावरणाचे. ‘एक अप्रेजल, पानी मे गयां… छपॅक…’ अशा ट्रेंडमध्येही ही वस्तुस्थिती मार्मिक स्वरुपात मांडली जात आहे. पण खासगी क्षेत्रांतील काही नोकरीमध्ये सेवेत असणाऱ्या वर्गाला मिळणाऱ्या पगारवाढीचा आकडा मागील वर्षाच्या तुलनेत कमी राहणार आहे. 2023 मध्ये पगारवाढीचा आकडा सरासरी 9.7 % इतका होता. यंदाच्या वर्षी हीच सरासरी 9.5 % पर्यंतच पोहोचू शकते.

एऑन पीएलसीमधूनसमोर आलेल्या माहितीनुसार कोरोनाच्या सावटातून जग बाहेर येऊ लागले तेव्हा, 2022 मध्ये समाधानकारक पगारवाढ झाल्याचे आकड्यांमार्फत लक्षात आलं. पण, त्यानंतर मात्र दोन आकडी पगारवाढ मिळण्यापासून एक मोठा नोकरदार वर्ग वंचित राहिला. भविष्यातही हे चित्र फारसं बदलणार नाही ही वस्तुस्थिती. जवळपास 45 खासगी उद्योग क्षेत्रांतील  1414 संस्थांमधून मिळालेल्या माहितीतून पगारवाढीसंदर्भातील ही आकडेवारी समोर आली.

2022 च्या तुलनेत 2023 मध्ये नोकरी सोडण्याचं प्रमाण 18.7 % वर पोहोचले आहे. यापूर्वी हा आकडा 21.4 % इतका होता. यामधून नोकरीच्या संधींमध्ये असणारी मोठी स्पर्धा आणि त्यामध्ये होणारी घट या दोन महत्त्वाच्या गोष्टी प्रकर्षाने समोर आल्या.

कुठं होणार सर्वाधिक पगारवाढ? 

संपूर्ण जगावर आर्थिक मंदीचे सावट असतानाही भारतातील अनेक कंपन्यांनी सरासरी 9.5 % पगारवाढ देण्याची तयारी दाखवली आहे. देशात येत्या काळात अर्थ विभाग, इंजिनिअरिंग, वाहन निर्मिती, एआय या आणि यासंबंधी काम करणाऱ्या कंपन्यांमध्ये समाधानकारक पगारवाढ मिळण्याची चिन्हे आहेत.

सध्या पगारवाढीचे दिवस पाहता पुढच्या काही महिन्यांमध्ये नोकऱ्या बदलणाऱ्यांचा आकडाही मोठा असेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. तेव्हा आता कोण कंपनीची साथ कायम ठेवणार आणि कोण सोडणार हेसुद्धा येत्या काही महिन्यांत स्पष्ट होणार आहे.

In the eyes of the employees, the hope of a huge salary increase in the election year

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात