Bye-Bye Amit लातूरमध्ये घुमतोय पवन कल्याण यांचा बाय-बाय अमित नारा

Bye-Bye Amit

विशेष प्रतिनिधी

लातूर : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री, दक्षिणात्य सुपरस्टार आणि जनसेवा पार्टीचे अध्यक्ष पवन कल्याण यांनी आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात बाय-बाय जगन ही घोषणा दिली होती. यानंतर तात्कालीन मुख्यमंत्री जगन मोहन रेडी यांना सत्तेतून पाय उतार व्हावं लागले. त्यावेळी ही घोषणा खूपच लोकप्रिय झाली अन जगमोहन रेडी यांना मोठा फटका बसला. अशातच भाजपा महायुतीच्या उमेदवार डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर यांच्या प्रचारार्थ पवन कल्याण लातूरला आले होते. याच दरम्यान त्यांनी रोडशोच्या माध्यमातून स्टेजवरच बाय-बाय जगन च्या धर्तीवर “बाय बाय अमित राव” ही घोषणा दिली. त्यामुळे उपस्थितीत असलेल्या नागरिकांमध्ये एकच जल्लोष बघायला मिळाला.

लातर शहर मतदार संघातून भाजपकडून डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या प्रचारासाठी पवन कल्याण यांचा अलीकडेच लातूर शहरात रोड शो पार पडला. असंख्य लोकांनी गर्दी करत पवन कल्याण यांच्या रँलीला उदंड प्रतिसाद दिला. याच दरम्यान पवन कल्याण यांनी रोडशोच्या दरम्यान महापुरुषांचे फोटो यात झळकवले. यातच बाय-बाय अमित असा पोस्टर देखील यादरम्यान त्यांच्याकडून झळकवला. याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.


Ajit Pawar मी शरद पवार साहेबांना सोडले नाही; निवडणुकीच्या तोंडावरच अजित पवारांचे मोठे विधान


दक्षिणात्य राज्यातून आलेल्या पवन कल्याण यांनी लातूरमध्ये आपल्या भाषणाची सुरुवात ही मराठी भाषेतून केली. त्यानंतर केवळ मत मागण्यासाठी आलं नसून आंबेडकर, छत्रपती, शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, मा जिजाऊ, महात्मा बसवेश्वर, बाळासाहेब ठाकरे आई तुळजाभवानी, राष्ट्रसंत यांना देखील त्यांनी अभिवादन केले. याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, नितीन गडकरी मुख्यमंत्री एकनाथी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि अजित पवार यांना महाराष्ट्रात आल्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी आभार मानले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात काश्मीरमधील 370 कलम हटवणे, आयोध्यातील राम मंदिर, जागतिक पातळीवर तिरंगीची शान व देशपातळीवर केलेले काम यांचा उल्लेख पवन कल्याण यांनी जाहीर सभेतून केला.

याच दरम्यान पवन कल्याण यांनी काँग्रेसचे विद्यमान आमदार अमित शहा यांच्यावर थेट हल्लाबोल केला. त्यामुळे लातूर शहरातील वातावरण फिरलं असल्याची चर्चा आता मतदारसंघात सुरू झाली आहे. यांच्या रोड शोला देखील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिल्याने यावेळी या मतदारसंघात मोठा बदल होईल का ? असे अशी शक्यता आता मतदारसंघात व्यक्त केली जाऊ लागली आहे.

In Latur Pawan Kalyan Bye-Bye Amit Slogan Resounds

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात