नाशिक : Dyanesh Maharao प्रभू रामचंद्र आणि अक्कलकोटचे स्वामी समर्थ यांची बदनामी करणारी व्यक्तव्य पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी केल्यानंतर महाराष्ट्रात मोठा जनक्षोभ उसळला. हिंदुत्ववादी पक्षांच्या नेत्यांनी ज्ञानेश महारावांच्या कार्यालयात जाऊन त्यांना माफी मागायला लावली. हिंदुत्ववाद्यांच्या दणक्यानंतर ज्ञानेश महाराव यांनी माफी मागितली. पण ज्या शरद पवारांच्या आणि खासदार शाहू महाराजांच्या “पुरोगामी” व्यासपीठावरून ज्ञानेश महाराव यांनी प्रभू रामचंद्र आणि स्वामी समर्थ यांची बदनामी केली होती आणि त्या बदनामीला पवार आणि शाहू महाराजांनी मूकसंमती दिली होती, त्या दोन “पुरोगामी” नेत्यांची ज्ञानेश महाराज यांनी मदत का नाही मागितली??, असा सवाल तयार झाला आहे.Dyanesh Maharao
ज्ञानेश महारावांनी आत्तापर्यंत त्यांच्या चित्रलेखा साप्ताहिकातून अनेक हिंदू नेत्यांची आणि देव देवतांची बदनामी केली. त्या बदनामीला त्यांनी पुरोगामीत्वाचे आवरण चढविले. त्यातून ज्ञानेश महाराव हे अभ्यासू आणि व्यासंगी पत्रकार असल्याची प्रतिमा निर्मिती महाराष्ट्रात झाली. परंतु, आर्थिक चणचणीतून ज्ञानेश महाराव यांना चित्रलेखा साप्ताहिक बंद करावे लागले. पण त्या “पुरोगामी” चित्रलेखा साप्ताहिकला पवार किंवा बाकीच्या कुठल्या “पुरोगामी” नेत्यांनी कुठली मदत केल्याची बातमी ऐकिवात किंवा पाहण्यात आली नाही.
ज्ञानेश महाराव यांची प्रतिमा व्यासंगी आणि पुरोगामी पत्रकार असे झाल्याने त्यांना अनेक पुरोगामी व्यासपीठांवर बोलवायची प्रथा आणि परंपरा तयार झाली. अशाच प्रथा परंपरेतून ज्ञानेश महाराव संभाजी ब्रिगेडच्या व्यासपीठावर पोहोचले. त्या व्यासपीठावरून त्यांनी प्रभू रामचंद्र आणि स्वामी समर्थ यांची बदनामी केली. त्यावेळी शरद पवार आणि काँग्रेसचे कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज तिथे हजर होते. त्यांनी देखील ज्ञानेश महाराज यांच्या वक्तव्याला त्यावेळी कुठलाही आक्षेप घेतल्याचे दिसले नाही. त्यांनी ज्ञानेश महाराव यांचे वक्तव्य ऐकून घेतले. त्यावर कुठलीही विरोधी प्रतिक्रिया देखील व्यक्त केली नाही.
पण ज्ञानेश महाराज यांचे ते वक्तव्य व्हायरल झाल्यानंतर मात्र महाराष्ट्रात जनक्षोभ उसळला. हिंदुत्ववादी पक्षांच्या नेत्यांच्या दबावामुळे ज्ञानेश महारावांना हात जोडून माफी मागावी लागली. पण त्यावेळी आपण केलेल्या वक्तव्यावर आपण ठाम असून माफी मागणार नाही, अशी भूमिका ज्ञानेश महाराव यांनी का घेतली नाही?? हिंदुत्ववादी नेत्यांचा दबाव झुगारण्यासाठी ज्ञानेश महाराज यांनी शरद पवार आणि शाहू महाराज यांच्यासारख्या पुरोगामी नेत्यांची मदत का मागितली नाही??, महाराज यांनी मदत मागितली असती, तर या दोन नेत्यांनी तशी मदत केली नसती का??, समजा मदत केली असती, तर ती कोणत्या स्वरूपात केली असती??, असे विविध सवाल या निमित्ताने समोर आले आहेत.
शरद पवारांनी आत्तापर्यंत अनेक “पुरोगामी” साहित्यिक – पत्रकारांना “बळ” दिल्याच्या बातम्या अनेकजण सांगतात. त्यामध्ये महाराष्ट्रातले गाजलेले नाटक आणि सिनेमा दिग्दर्शकही आहेत, पण पवारांनी आपल्या घेतलेल्या कुठल्याही “पुरोगामी” भूमिकेवर ते ठाम राहिलेत आणि त्यांनी पुरोगामी साहित्यिक किंवा पत्रकारांना बळ दिले??, अशी किती आणि कुठली उदाहरणे आहेत??, याचा नेमका लेखाजोखा कुणी मांडला आहे का??
भीमा कोरेगाव प्रकरणात शरद पवारांनी पत्रकार परिषदांमध्ये आणि जाहीर भाषणांमध्ये संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे वगैरे हिंदुत्ववाद्यांवर आरोप केले, पण त्याविषयी महाराष्ट्राच्या सरकारने नेमलेल्या आयोगासमोर मात्र त्या आरोपांबद्दल शरद पवार ठाम राहिल्याचे चित्र दिसले नाही. उलट त्यांनी कायद्याच्या चौकटीत अडकू नये यासाठी चौकशी आयोगासमोर घुमजावच केल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये आल्या.
ज्ञानेश महाराव प्रकरणात पवारांनी नेमके हेच केले का?? की त्यामुळे ज्ञानेश महाराव पवारांच्या “पुरोगामी जाळ्यात” अडकून फसले आणि हिंदुत्ववाद्यांच्या तडाख्यासमोर त्यांना माफी मागावी लागली, असे काही घडले आहे का??, याविषयी दाट शंका विचारणाऱ्या अनेक पोस्ट सोशल मीडियात फिरत आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App