Hezbollah : हिजबुल्लाहची प्रथमच युद्धविरामाची मागणी; गाझामध्ये युद्ध थांबवण्याची अटही नाही; दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायली सैनिकांनी फडकावला झेंडा

Hezbollah

वृत्तसंस्था

बैरुत : Hezbollah लेबनॉनमध्ये इस्रायलच्या हल्ल्यादरम्यान हिजबुल्लाने युद्धविरामाची मागणी केली आहे. सीएनएनच्या वृत्तानुसार, या संघटनेने पहिल्यांदाच जाहीरपणे युद्धविरामाला पाठिंबा दिला असून गाझामधील युद्ध थांबवण्याची कोणतीही अट ठेवली नाही. हमासला पाठिंबा देणाऱ्या हिजबुल्लाने गेल्या वर्षी ८ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हवाई हल्ले केले होते. या घटनेला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल हिजबुल्लाचे उपप्रमुख नईम कासिम यांनी मंगळवारी भाषण केले. Hezbollah

कासिम म्हणाले की, हिजबुल्लाह लेबनीज संसदेचे अध्यक्ष नबीह बेरी यांनी युद्धविरामासाठी केलेल्या प्रयत्नांना पाठिंबा देतो. एकदा युद्धविराम झाला की इतर गोष्टींवर चर्चा होईल. गाझामध्ये जेव्हा युद्धविराम होईल तेव्हाच इस्रायलवरील हल्ले थांबवतील, असे हिजबुल्लाहने यापूर्वी म्हटले आहे.


Ratan Tata : रतन टाटा यांचे वयाच्या 86व्या वर्षी निधन; ब्रीच कँडी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास


39 इराणी खासदारांची अण्वस्त्रे बनवण्याची मागणी

इराणमधील 39 खासदारांनी देशाच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेला पत्र लिहून अण्वस्त्रे विकसित करण्याची मागणी केली आहे. अल्जझीराच्या वृत्तानुसार, इराणच्या संरक्षण तत्त्वांमध्ये बदल करण्याची गरज असल्याचे त्यात म्हटले आहे.

पत्र लिहिणाऱ्या खासदारांपैकी एक अखलाघी म्हणाले की, आज जगातील एकही आंतरराष्ट्रीय संस्था, युरोपीय देश किंवा अमेरिकेत इस्रायलला रोखण्याची ताकद नाही. त्यांना जो काही गुन्हा करायचा आहे, तो ते करत आहेत.

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी दोन दशकांपूर्वी अण्वस्त्रे बाळगणे इस्लामच्या विरोधात असल्याचा धार्मिक आदेश जारी केला होता. मात्र, तेव्हापासून इराणमध्ये अण्वस्त्रे बनवण्यासाठी अनेक मागण्या होत आहेत.

Hezbollah calls for ceasefire for first time; There is not even a condition to stop the war in Gaza; Israeli soldiers raise the flag in South Lebanon

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात