विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मुस्लिम बहुल किश्तवाडमधून भाजपा उमेदवार शगुन परिहार विजयी झाल्या आहेत. नॅशनल कॉन्फरन्सच्या सज्जाद अहमद किचलूचा 521 मतांनी पराभव केला. Shagun Parihar win in kistwad in JK
किश्तवाड ही मुस्लिम बहुसंख्य जागा असून तिथे जिथे 70% पेक्षा जास्त लोकसंख्या मुस्लिम आहे. 2018 मध्ये शगुन परिहारचे वडील आणि काका यांची इस्लामिक दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली होती.
सोशल मीडियावर शगुन परिहारांच्या विजयाबद्दल प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे.
Harshvardhan Patil : हर्षवर्धनना पक्षात घ्यायची पवारांची घाई; इंदापूरातल्या पवार निष्ठावंतांचाच उद्रेक होई!!
जम्मू काश्मीर मधून आपल्या बहिणीचा विजय ही आजच्या दिवसातील सर्वांत मोठी बातमी आहे. मुस्लिम बहुल भाग असून आणि जीवाला प्रचंड धोका असून ही जीवाची पर्वा न हजारो मतदारांनी करता मतदान केले. बहीण शगुन यांची दाद द्यावी वाटते की प्रचंड टोकाचा विरोध व जीवाला धोका असताना ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला हे खरच कौतुकास्पद आणि अभिमानास्पद असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली.
आपले पूर्वज हे सिंहासारखे छातीवर घाव झेलून मृत्युमुखी पडले आणि आज आपण जीवाला एवढे जपत आहोत. किरकोळ गोष्टींसाठी सरकारला जबाबदार धरत आहोत व प्रत्येक गोष्टीत सरकारच काहीतरी करेल ही नाहक अपेक्षा धरत आहोत. सरकार, सरकारच काम करत आहे. परंतु जमीन पातळीवरील लढाई आज ना उद्या ही आपल्यालाच लढायची आहे याचे भान राहू द्या!!, असे काहींनी ट्विटर हँडल वर लिहिले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App