वृत्तसंस्था
मुंबई : Chandrakant Handore मुंबईत शहरात हिट अँड रनची घटना घडली आहे. काँग्रेस खासदार चंद्रकांत हंडोरे ( Chandrakant Handore ) यांच्या मुलाने आपल्या कारने एका दुचाकीस्वाराला धडक दिली असून, त्यात 1 तरुण गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी हंडोरे यांच्या मुलाला अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.Chandrakant Handore
पोलिसांच्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री ही घटना घडली. आरोपी गणेश हंडोरे हा ज्यूस पिण्यासाठी गोवंडीच्या दिशेला जात होता. तेथून परत येताना चेंबूर येथील आचार्य कॉलेजलगत त्याने गोपाळ आरोटे नामक एका दुचाकीस्वाराला धडक दिली. त्यानंतर गणेश हंडोरे तिथे थांबला नाही. त्याने तशीच आपली कार पुढे दामटली. काही प्रत्यक्षदर्शींनी त्याचा पाठलाग केला. पण तो हाती लागला नाही.
या घटनेनंतर गोवंडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून गणेश हंडोरे यांना अटक केली. पण अटकेनंतर त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी वाढल्यामुळे त्याला तत्काळ जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली. दुसरीकडे, या घटनेत जखमी झालेल्या गोपाळ आरोटेवर झेन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी या प्रकरणी गणेश हंडोरे याच्यावर BNS कलम 110, 125(अ), (ब),281 व मोटार वाहन कायदा कलम 134(अ), (ब), 184 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
चिंचपोकळी भागातही हिट अँड रन
दुसरीकडे, मुंबईच्याच चिंचपोकळी पुलावर एका टम्पोने दिलेल्या धडकेत 1 पादचारी व्यक्ती ठार झाला आहे. या घटनेनंतर आरोपी टेम्पोचालक घटनास्थळावरून पसार झाला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
मयूर प्रदीप लाडीवाल (वय 38) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. त्याला गंभीर अवस्थेत नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मुंबईच्या आग्रीपाडा पोलिसांनी बीएनएस व मोटार वाहन कायद्याच्या कलम 281,125 (ब), 106(2) अन्वये अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App