PM Modi targets : महाराष्ट्र दौऱ्यात राहुल गांधींचे जुनेच संविधान नॅरेटिव्ह; पण मोदींच्या ड्रग्स विरोधी हल्ल्यात काँग्रेस गारद!!


विशेष प्रतिनिधी

मुंबई : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्राच्या दुसऱ्या दौऱ्यात जुनाच संविधान नॅरेटिव्ह चालवायचा प्रयोग करून पाहिला, पण कालच दिल्लीमध्ये सापडलेल्या 5600 कोटींच्या ड्रग्स रॅकेटचा मास्टर माईंड काँग्रेस नेताच निपजल्याने पंतप्रधान मोदींना महाराष्ट्र दौऱ्यामध्ये काँग्रेसवर हल्लाबोल करायची जोरदार संधी मिळाली आणि त्यांच्या हल्ल्यात काँग्रेसवर गारद व्हायची पाळी आली. PM Modi targets Congress over 5600 cr drugs issue from maharashtra

राहुल गांधींनी आज कोल्हापूर दौऱ्यामध्ये कसबा बावड्यात भगवा चौकात उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले. त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि भारताचे संविधान या विषयावर भले मोठे व्याख्यान दिले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारातूनच संविधान निर्मिती झाली, पण सध्याचे सरकार संविधानाची मूल्यं पाळत नाही, असा आरोप राहुल गांधींनी केला. मोदी सरकार संविधान बदलणार असल्याचा नॅरेटिव्ह लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि मित्र पक्षांनी चालविला होता. त्याला मर्यादित यश आले. परंतु, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राहुल गांधींसकट काँग्रेस नेत्यांनी संविधानाचा जुना नॅरेटिव्ह चालवायचा प्रयत्न केला.

मात्र कालच दिल्लीत 5600 कोटी रुपयांचे ड्रग्स पकडली आणि त्याचा मास्टर माईंड काँग्रेसचा नेता तुषार गोयल निघाला. तुषार आणि त्याच्या चेला चपाट्यांनी दिल्लीमध्ये कोकेनचा प्रचंड साठा करून ठेवला होता. तो पोलिसांना सापडला. त्याची सगळी पाळेमुळे पोलिसांनी खोदून काढल्यानंतर 12 जणांना अटक केली. दुबईतून हे रॅकेट चालवले जात होते, हेही उघड्यावर आले. या सगळ्या प्रकारात काँग्रेस पुरती अडकली. कारण काँग्रेसने ड्रग्स मधून मिळवलेला पैसा निवडणुकीत वापरला, अशा संशयाचे मळभ तयार झाले.


JP Nadda : जेपी नड्डा यांचा काँग्रेसवर हल्लाबोल- केंद्राने मदत केली नाही तर हिमाचल सरकार चालवू शकत नाही; ​​​​​​​त्यांनी शौचालयावरही कर लावला


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेमक्या याच मुद्यावरून काँग्रेस वर प्रहार केला. काँग्रेस देशातल्या युवकांना व्यसनांमध्ये ढकलते. नशागिरीतून पैसा कमावते. तो पैसा निवडणुकीत वापरते. अर्बन नक्षलवादी अख्खा काँग्रेस पक्ष याच ड्रग्सच्या पैशावर चालवतात, अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोहरादेवी गड आणि ठाण्यातल्या सभांमधून केली.

वास्तविक मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते जयराम रमेश यांनी ट्विटर हँडलवर मोदी आणि भाजप यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली होती. त्यातून मोदी आणि भाजपला अडचणीत आणण्याचा आणि त्याचवेळी राहुल गांधींच्याही महाराष्ट्र दौऱ्याचा नॅरेटिव्ह सेट करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. पण काल दिल्लीतले ड्रग्स प्रकरण उघडकीस आल्यानंतर काँग्रेस संपूर्ण देशभरातच बॅकफूटवर गेली. मोदींना महाराष्ट्र दौऱ्यात त्या निमित्ताने काँग्रेसला चांगलेच ठोकून काढायची संधी मिळाली. ती त्यांनी पुरेपूर उचलली. त्यामुळे राहुल गांधींनी छत्रपती शिवाजी महाराजांनी संविधान या विषयावर दिलेले व्याख्यान महाराष्ट्रात तरी नवा कुठला नॅरेटिव्ह सेट करू शकले नाही.

PM Modi targets Congress over 5600 cr drugs issue from maharashtra

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात