Kolkata rape-murder case कोलकाता रेप-हत्याप्रकरणी CBIच्या आरोपपत्रात 11 पुरावे; ट्रेनी डॉक्टरने विरोध केला होता, आरोपी संजयच्या अंगावर खुणा

Kolkata rape-murder case

वृत्तसंस्था

कोलकाता : कोलकाता प्रशिक्षणार्थी डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपी संजय रॉय विरोधात सीबीआयने 11 पुरावे गोळा केले आहेत. हे सर्व पुरावे आरोपपत्रात नमूद करण्यात आले असून संजय रॉयला मुख्य आरोपी करण्यात आले आहे. Kolkata rape-murder case

पीटीआय या वृत्तसंस्थेने आरोपपत्राच्या प्रतीचा हवाला देत वृत्तात म्हटले आहे की, पीडितेने घटनेदरम्यान संजयला विरोध केला होता. या आरोपपत्रात पीडितेला व्ही. नावाने संबोधित केले आहे. संजयचा डीएनए पीडितेच्या शरीरावर सापडला असून लहान केसही सापडले आहेत.

कोलकात्याच्या आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये ८ ऑगस्टच्या रात्री एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. 9 ऑगस्ट रोजी पीडितेचा मृतदेह मेडिकल कॉलेजमध्ये आढळून आला होता. प्राथमिक तपासानंतर संजय रॉयला पोलिसांनी १० ऑगस्टला अटक केली होती.

या घटनेच्या निषेधार्थ प्रशिक्षणार्थी डॉक्टर उपोषणावर आहेत, ज्यामध्ये फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशन (एफएआयएमए) देखील सामील झाले आहे. आज FAIMA देशभरात उपोषणावर आहे.


Ratan Tata : रतन टाटा यांचे वयाच्या 86व्या वर्षी निधन; ब्रीच कँडी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास


सीबीआयच्या आरोपपत्रात काय?

पीडितेच्या शरीरावर संजयच्या डीएनएची पुष्टी झाली आहे. लहान केसही सापडले आहेत. संजयच्या जीन्सवरही पीडितेचे रक्त आढळले.

घटनेवेळी पीडितेने संजयला विरोध केला होता. त्यामुळे संजयला दुखापत झाली. संजयच्या अंगावर पीडितेच्या संघर्षाच्या खुणा आढळून आल्या.

घटना घडलेल्या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेजमध्ये संजय रॉयची उपस्थिती आढळून आली आहे. याशिवाय संजयचा कॉल डिटेल रिपोर्ट आणि मोबाईल लोकेशनवरूनही तो घटनास्थळी उपस्थित असल्याची पुष्टी झाली.

सीबीआयने पहिल्या आरोपपत्रात म्हटले होते – गँगरेप नाही

पहिल्या आरोपपत्रात प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर सामूहिक बलात्कार झाल्याची शक्यता सीबीआयने फेटाळून लावली होती. हा गुन्हा संजय रॉयने एकट्याने केल्याचे सीबीआयने म्हटले आहे. जवळपास 100 साक्षीदारांचे जबाब घेतल्यानंतर आणि 12 पॉलीग्राफ चाचण्या घेतल्यानंतर सीबीआयने हा निष्कर्ष काढला.

सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांनी संजयची ओळख पटवली. फुटेजमध्ये तो ९ ऑगस्टला पहाटे ४ वाजता सेमिनार हॉलमध्ये शिरताना दिसत होता. यावेळी त्याने कानात इअरफोन घातले होते. सुमारे ४० मिनिटांनी तो हॉलमधून बाहेर आला तेव्हा त्याच्याकडे इअरफोन नव्हते. पोलिसांना गुन्ह्याच्या ठिकाणी ब्लूटूथ इअरफोन सापडला होता, जो त्याच्या फोनला जोडलेला होता.

Kolkata rape-murder case

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात