विशेष प्रतिनिधी
पुणे : एकीकडे सगळ्या जगाला ज्ञान शिकवणाऱ्या पुण्यात प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मतदानाचा टक्का घसरला, पण काँग्रेसचे प्रभारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी मात्र आपल्या नावावर बोगस मतदान झाल्याचा दावा केला. पुण्यात सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत फक्त 44.90% मतदानाची नोंद झाली होती. जी महाराष्ट्रातल्या चौथ्या टप्प्यातल्या 11 मतदारसंघांमध्ये तळातली होती. पुणेकरांनी भरभरून मतदानाला प्रतिसाद देण्याऐवजी थंड प्रतिसाद दिला. पण अरविंद शिंदे यांनी आपल्या नावावर बोगस मतदान झाल्याचा दावा केला. Congress city president Arvind Shinde claims that bogus voting was done in his name
सकाळी 11.00 वाजण्याच्या सुमारास सेंट मीरा स्कूलमध्ये मतदानासाठी आल्यानंतर त्यांच्या नावावर मतदान झाल्याचे निदर्शनास आले. त्यांच्या नावावर कोणीतरी अज्ञात व्यक्तीने मतदान करून गेल्याचे स्पष्ट झाले. परंतु तरीही शिंदे यांना टेंडर व्होट अंतर्गत मतदान करण्याची संधी दिली गेली. मात्र, त्याची गणना आपत्कालीन परिस्थितीत केली जाऊ शकते. त्यामुळे शिंदे यांचे मत वाया गेल्यातच जमा आहे.
याबाबत अरविंद शिंदे म्हणाले, मी सकाळी 11.00 ते 12.00 दरम्यान सेंट मीरा स्कूल मध्ये मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलो होतो. त्यावेळी पोलिंग बूथच्या रजिस्टरमध्ये माझ्या नावावर कोणीतरी मतदान केल्याचाच धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या संदर्भात मी संबंधित अधिकारी यांच्याकडे तक्रार दिली. दरम्यान टेंडर व्होट सुविधेअंतर्गत मला मतदान करण्याची संधी दिली. परंतु, त्या मताची गणना केली जाईल की नाही याबाबत शंका आहे. हा अत्यंत गंभीर प्रकार आहे. यासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना भेटून त्यांनी बोगस मतदाना संदर्भात दावा करून तक्रार दाखल केली.
महाराष्ट्रात सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत सरासरी सुमारे 52.49 % मतदानाची नोंद झाली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App