फोडाफोडीच्या राजकारणावरून आज बोंबाबोंब, पण त्या राजकारणाचे तर शरद पवारच जनक!!

Sharad pawar started politics of breaking and making parties for power in maharashtra

– राज ठाकरे यांचा ठाण्यातून हल्लाबोल

विशेष प्रतिनिधी

ठाणे : फोडाफोडीच्या राजकारणावरून आज महाराष्ट्रात बोंबाबोंब चाललीय, पण तसल्या राजकारणाचे शरद पवार हे तर जनक आहेत, अशा परखड शब्दांमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोन्ही नेत्यांवर शरसंधान साधले. Sharad pawar started politics of breaking and making parties for power in maharashtra

शिवसेनेचे उमेदवार श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांच्या प्रचारार्थ ठाण्यामध्ये राज ठाकरेंची सभा शिवसेनेने आयोजित केली होती. यावेळी राज ठाकरेंनी पुन्हा एकदा “लाव रे तो व्हिडीओ”चा प्रयोग केला. राज यांनी सुषमा अंधारे यांचा बाळासाहेब ठाकरेंवरील टीकेचा व्हिडीओ दाखवला. बाळासाहेबांचा म्हातारा म्हणून अपमान करणाऱ्या बाईंना तुम्ही शिवसेनेत प्रवेश देऊन त्यांना प्रवक्ता करता कसली तुमची शिवसेना असा टोला राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना हाणला.

राज ठाकरे म्हणाले :

बाहेरुन येणाऱ्या लोंढ्यांचे सगळ्यात जास्त प्रमाण हे ठाणे जिल्ह्यात आहे. आधी ग्रामपंचाय, नंतर नगर परिषद, नंतर महानगर पालिका.. असं चक्र सुरु आहे. हे सगळं ठरतं ते लोकसंख्येवरुन. बाकीच्या जिल्ह्यात एखादी महानगर पालिका असते. परंतु ठाण्यात सात ते आठ महानगर पालिका आहेत. बाहेरचे लोंढे थांबवले नाहीतर तर कितीही रस्ते केले, पूल बांधले तरी काहीही फरक पडणार नाही. मेट्रो आणली तरी कमीच पडणार आहे. मूळ माणसाच्या हाती काहीही पडणार नाही. त्यामुळे श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांनी दिल्लीत गेल्यानंतर हे लोंढे थांबवा.



मी ही पहिली लोकसभेची निवडणूक बघतोय, या निवडणुकीला विषयच नाही. त्यामुळे सगळेजण एकमेकांचा उद्धार करताना दिसून येत आहेत. लोकांच्या जीवन-मरणाचे मुद्दे निवडणुकीत आले पाहिजेत, परंतु तसं होत नाही. ‘माझे वडील चोरले’ अशा मुद्द्यावर निवडणुका होत आहेत. आज जे बोलतायत आमचा पक्ष फोडला.. आमचा पक्ष फोडला, याच उद्धव ठाकरेंनी मनसेचे नगरसेवक खोके देऊन फोडले होते.

महाराष्ट्रात फोडाफोडीच्या राजकारणाची सुरुवात कोणी केली असेल, तर ती शरद पवारांनी केली. 1978 मध्ये पवारांनी काँग्रेस फोडून पुलोदचं सरकार आणलं. 1992 मध्ये शरद पवारांनी छगन भुजबळांना फितवून बाळासाहेबांची शिवसेना फोडली. त्यानंतर नारायण राणेंना काँग्रेसमध्ये घेऊन त्यांच्यासोबत शिवसेनेचे आमदार फोडले. छगन भुजबळ यांनी बाळासाहेब ठाकरे यांना अटक करण्याची धमकी दिली होती. त्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही मंत्रिमंडळात बसला तेव्हा का नाही लाज वाटली??

उद्धव ठाकरे तुम्ही, माझे वडील चोरले.. माझे वडील चोरले म्हणताएत ना मी एकच क्लिप दाखवतो.” असं म्हणत राज ठाकरेंनी लाव रे तो व्हिडीओ, असं म्हटलं आणि सुषमा अंधारेंचा व्हिडीओ सुरु झाला. व्हिडीओमध्ये अंधारे म्हणाताहेत की, ८०-८५ वर्षांच्या म्हताऱ्याच्या हातात तलवार देऊन काय उपयोग.. हात थरथरथर कापायला लागलेत… काय उपयोग.” ही जुनी क्लिप राज ठाकरेंनी पुन्हा दाखवली.

राज ठाकरे पुढे म्हणाले की, याच बाईंना उद्धव ठाकरेंनी पक्षाचं उपनेतेपद दिलंय. भुजबळांनी बाळासाहेबांना अटक केली त्यांच्याच मांडीला मांडी लावून तुम्ही बसता आणि बाळासाहेबांवर प्रेम आहे असं म्हणता?? असं म्हणत राज यांनी उद्धव ठाकरेंवर प्रश्न उपस्थित केले.

Sharad pawar started politics of breaking and making parties for power in maharashtra

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात