१४ मे रोजी रांची येथील ईडीच्या झोन कार्यालयात चौकशीसाठी बोलावले
विशेष प्रतिनिधी
टेंडर कमीशन घोटाळ्याप्रकरणी मनी लाँड्रिंगची चौकशी करणाऱ्या ईडीने आता ग्रामविकास मंत्री आलमगीर आलम यांना समन्स बजावले आहे. ईडीने त्यांना १४ मे रोजी रांची येथील ईडीच्या झोन कार्यालयात चौकशीसाठी बोलावले आहे.ED sent summons to Congress leader Alamgir Alam called for questioning
याच प्रकरणात ग्रामीण बांधकाम विभागाचे माजी मुख्य अभियंता वीरेंद्र राम, त्यांचा पुतण्या आलोक रंजन, वीरेंद्र राम यांचे चार्टर्ड अकाउंटंट मुकेश मित्तल यांचे सहकारी हरीश यादव, त्यांचे सहकारी नीरज मित्तल, रामप्रकाश भाटिया आणि ताराचंद यांना ६ मे रोजी अटक करण्यात आली होती. मंत्री आलमगीर आलमचा स्वीय सचिव संजीव लाल आणि संजीव लालचा नोकर जहांगीर आलम यांना अटक करण्यात आली.
नुकतच, ईडीने मंत्री आलमगीर आलम यांचे स्वीय सचिव संजीव लाल आणि संजीव लाल यांचे नोकर जहांगीर आलम यांच्याशी संबंधित ठिकाणांहून 38 कोटी रुपये जप्त केले आहेत. यातील 32 कोटी 20 लाख रुपये हरमू रोडवरील सर सय्यद अपार्टमेंट येथील नोकर जहांगीर आलम यांच्या फ्लॅटमध्ये सापडले. उर्वरित रक्कम संजीव लाल यांच्या जवळच्या कंत्राटदारांकडून वसूल करण्यात आली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App