नागरिकांना सध्या सुरु असलेल्या नाताळ आणि वर्षअखेर या काळात कोरोनाबाबत काळजी घेण्याचं आणि जास्तीत जास्त मास्क वापरण्याचं आवाहन केलं आहे.Booster dose will definitely strengthen Modiji’s fight against three-pronged coron – Chandrakant Patil
विशेष प्रतिनिधी
नवी-दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशाला लसीकरणासंदर्भात संबोधित केलं.यावेळी त्यांनी नागरिकांना सध्या सुरु असलेल्या नाताळ आणि वर्षअखेर या काळात कोरोनाबाबत काळजी घेण्याचं आणि जास्तीत जास्त मास्क वापरण्याचं आवाहन केलं आहे.दरम्यान यावेळी नरेंद्र मोदी यांनी आज बूस्टर डोसबाबत महत्वाच्या घोषणा देखील केल्या आहेत.
याच पार्श्वभूमीवर भाजप नेते चंद्रकांत पाटील ट्विट द्वारे म्हणाले की,’पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा त्यांची दूरदृष्टी आणि सत्वर निर्णय घेण्याच्या क्षमतेचा प्रत्यय दिला आहे.ओमायक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेत किशोरवयीन मुला-मुलींचे लसीकरण, आरोग्य कर्मचारी आणि ज्येष्ठांसाठी आणखी एक लस ही मोदीजींची त्रिसूत्री कोरोनाविरोधी लढा नक्कीच बळकट करेल’, असे पाटील म्हणाले आहेत.
पंतप्रधान @narendramodi जींनी पुन्हा एकदा त्यांची दूरदृष्टी आणि सत्वर निर्णय घेण्याच्या क्षमतेचा प्रत्यय दिलाय. ओमायक्रोनचा वाढता धोका लक्षात घेत किशोरवयीन मुला-मुलींचं लसीकरण, आरोग्य कर्मचारी आणि ज्येष्ठांसाठी आणखी एक लस ही मोदीजींची त्रिसूत्री कोरोनाविरोधी लढा नक्कीच बळकट करेल. — Chandrakant Patil (Modi Ka Parivar) (@ChDadaPatil) December 26, 2021
पंतप्रधान @narendramodi जींनी पुन्हा एकदा त्यांची दूरदृष्टी आणि सत्वर निर्णय घेण्याच्या क्षमतेचा प्रत्यय दिलाय. ओमायक्रोनचा वाढता धोका लक्षात घेत किशोरवयीन मुला-मुलींचं लसीकरण, आरोग्य कर्मचारी आणि ज्येष्ठांसाठी आणखी एक लस ही मोदीजींची त्रिसूत्री कोरोनाविरोधी लढा नक्कीच बळकट करेल.
— Chandrakant Patil (Modi Ka Parivar) (@ChDadaPatil) December 26, 2021
१) १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणास ३ जानेवारी २०२२ पासून सुरुवात करण्यात येणार . २)आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी बूस्टर डोस १० जानेवारीपासून सुरु होणार . ३) ६० वर्षांवरील जेष्ठ नागरिकांना सुद्धा बूस्टर डोसचा पर्याय उपलब्ध करण्यात आला असून डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना बूस्टर डोस दिल्या जाणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App