भाग्यनगरच्या भाग्योदयाला सुरूवात, हैद्राबादमधील निवडणूक निकालाबाबत योगी आदित्यनाथ यांचे वक्तव्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवल्याबद्दल भाग्यनगरच्या जनतेचे कोटी कोटी आभार. भाग्यनगरच्या भाग्योदयाला सुरूवात झाली आहे, अशा शब्दांत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हैद्राबादमधील निवडणूक निकालाबाबत समाधान व्यक्त केले आहे. yogi adityanath news


वृत्तसंस्था

लखनऊ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवल्याबद्दल भाग्यनगरच्या जनतेचे कोटी कोटी आभार. भाग्यनगरच्या भाग्योदयाला सुरूवात झाली आहे, अशा शब्दांत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हैद्राबादमधील निवडणूक निकालाबाबत समाधान व्यक्त केले आहे. yogi adityanath news

एमआयएमचे असदुद्दीन ओवेसींचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या हैदराबादमध्ये भगवी लाट आल्यासारखे वातावरण आहे. त्यामुळे गेल्या वेळी तीन जागा मिळवणाऱ्या भाजपने 49 जागांवर विजय मिळवला आहे. टीआरएसने 55 जागा जिंकल्या असून एमआयएमने 44 जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसला 2 जागांवरच समाधान मानावे लागले आहे.

yogi adityanath news

भाजपने या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी जबरदस्त प्रचार आणि प्रसार केला होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, स्मृती इराणी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी हैदराबादमध्ये जाऊन प्रचार केला होता. या वेळी बोलताना योगी आदित्यनाथ यांनी हैद्राबादचे नामांतर करून भाग्यनगर ठेवण्याचे आश्वासन दिले होते. याच पार्श्वभूमीवर जनतेने दिलेल्या मतांच्य कौलावर त्यांनी समाधान व्यक्त केले होते.

yogi adityanath news

2016 मध्ये झालेल्या हैदराबाद महापालिका निवडणूक निकालात टीआरएसने 150 पैकी 99 जागांवर विजय मिळवला होता. असदुद्दीन ओवेसी यांचा पक्ष एमआयएमला 44 जागां मिळाल्या होत्या. भाजपला केवळ तीन जागांवर विजय मिळवता आल्या होत्या.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात