दोन ऑलिम्पिक पदके जिंकणारा देशाच्या इतिहासातील एकमेव खेळाडू असलेला कुस्तीवीर सुशील कुमारवर खुनाचा आरोप आहे. तरुण पहिलवान सागर राणा याच्या खुनाचा सूत्रधार असल्याचा ठपका बसल्यापासून सुशील कुमार त्याचा साथीदार अजय कुमार याच्यासह फरार होता. अखेरीस त्याला शनिवारी रात्री उशीरा पंजाबातून अटक करण्यात आली आहे. Wrestler, two time Olympian Sushil Kumar arrested By Delhi Police, Sushil and his right hand Ajay accused in the case Junior Champion Wrestler Sagar Rana’s murder
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी शनिवारी (दि. 22) सागर राणा यांच्या हत्येप्रकरणी ऑलिम्पिक पदकविजेता कुस्तीपटू सुशील कुमार आणि त्याचा उजवा हात अजय कुमार याला अटक केली. दिल्ली पोलिसांनी या दोघांनाही पंजाबमध्ये पकडले आहे.
युवा पहिलवान सागर राणा याच्या खुनाचा आरोप झाल्यापासून सुशील कुमार फरार होता. पंजाबात अटक केल्यानंतर या दोघांना मध्यरात्रीनंतर दिल्लीत आणले गेले. सागर राणा या युवा पहिलवानावर सुशील कुमार आणि इतर दोघांनी हल्ला केल्याच्या आरोप आहे. दिल्लीतल्या स्टेडियमच्या आवारात ही घटना घडली होती. त्यानंतर सुशील कुमारचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला होता. त्यावेळी न्यायाधीशांनी नमूद केले की “आरोपींवरील आरोप गंभीर स्वरूपाचे आहेत. आतापर्यंतच्या तपासणीच्या नोंदीतून हे उघडकीस आले आहे की आरोपी (सुशील कुमार) हा मुख्य सूत्रधार होता.”
दिल्ली पोलिसांनी फरार सुशील कुमारच्या अटकेसाठी लूकआऊट नोटीस व अजामीनपात्र वॉरंट बजावले होते. त्याची माहिती देण्यासाठी एक लाख रुपयांचे तर त्याचा साथीदार अजय कुमारची माहिती देणाऱ्यास पन्नास हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. सागर राणा सोबत झालेल्या भांडणाच्या खटल्यात दिल्लीच कोर्टाने शनिवारी पुन्हा सुशील आणि इतर सहा जणांविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढले होते. भांडणात सहभागी असल्याच्या आरोपाची पोलिसांनी आधीच नोंद केली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App