शरद पवार म्हणतात : मध्यावधी निवडणुकांना तयार राहा;… पण राष्ट्रवादीला त्या हव्यातच का??


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या आमदारांना महाराष्ट्र विधानसभेच्या मध्यावधी निवडणुकांसाठी तयार राहण्याचे आवाहन करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. शरद पवारांच्या वक्तव्यातून शिंदे  फडणवीस सरकार अस्थिर करण्याचे निवेदन स्पष्ट होतेच, पण त्याहीपेक्षा हे सरकार निदान पाच-सहा महिने तरी चालेल असे सूचित होऊन शिवसेनेलाही डिवचणेही साध्य झाले आहे!!Why sharad Pawar is insisting on mid term polls in maharashtra??

 सरकार पाच-सहा महिने टिकणे

शरद पवारांच्या या विधानाचा नजीकचा अर्थ म्हणजे शिंदे फडणवीस सरकार विश्वास दर्शक ठराव संमत करून घेण्यात यशस्वी होईल, इतकेच नव्हे तर सुप्रीम कोर्टातली लढाई देखील शिंदे – फडणवीस सरकार पार करेल असाच त्याचा अर्थ होतो. त्या पलिकडचा एक महत्त्वाचा अर्थ शरद पवारांच्या विधानात दडला आहे, तो म्हणजे काँग्रेस, शिवसेना भाजप हे तीन पक्ष वगळता फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच मध्यावधी निवडणुकांची बात करत आहे!! याचा अर्थ स्पष्ट आहे, राष्ट्रवादी काँग्रेसला महाराष्ट्रात भाजप बरोबर राजकीय दृष्ट्या समान पातळीवर टक्कर घ्यायची उत्सुकता आहे.राष्ट्रवादीचे आर्थिक भरण पोषण

गेल्या अडीच वर्षात शिवसेनेबरोबर सत्ता वापरून राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षीय पातळीवर स्वतःचे आर्थिक भरण पोषण करून घेतले आहे. राष्ट्रवादीने आपल्या आमदारांना भरपूर निधीचे वाटप केलेच आहे, पण शिवसेनेच्या बहुसंख्य विद्यमान आमदारांच्या मतदार संघातील प्रतिस्पर्धी नेत्यांना भरपूर निधी देऊन आपले मूळ राजकीय आणि आर्थिक ध्येय गेल्या अडीच वर्षात राष्ट्रवादीने साध्य करून घेतले आहे आणि आता मध्यावधी निवडणुकांच्या निमित्ताने हे सगळी साधन संपत्ती वापरायची आहे. तिचा वापर करून काँग्रेस आणि शिवसेना यांच्यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसला महाराष्ट्रात प्राबल्य प्रस्थापित करायचे आहे.

 2024 ची वाट पाहणे धोकादायक

यासाठी 2024 च्या निवडणुकांची वाट पाहण्यात स्वतः शरद पवारांना आणि राष्ट्रवादीच्या बाकीच्या नेतृत्वाला अर्थ वाटत नाही. कारण 2024 च्या निवडणुकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा जो करिष्मा चालेल आणि भाजप नावाच्या पक्षाचा जो राजकीय झपाटा चालेल त्यामध्ये अखिल भारतीय काँग्रेसच काय पण बाकी सर्व प्रादेशिक पक्ष उडून जाण्याची भीती राष्ट्रवादी काँग्रेससह सर्व प्रादेशिक पक्षांना वाटते आहे. लोकसभा निवडणुकीची तयारी भाजप एवढी आणि भाजप सारखी साधनसंपत्ती वापरून बाकी कोणताही पक्ष करू शकत नाही किंवा त्याच्या जवळपासही तो पोहोचू शकत नाही ही आजची राजकीय वस्तुस्थिती आहे. याची पक्की जाणीव शरद पवार यांच्यासारख्या चाणाक्ष नेत्याला आहे आणि त्यामुळेच 2024 पूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसची महाराष्ट्रातील स्थिती शिवसेना आणि काँग्रेस यांच्यापेक्षा तरी निदान भक्कम व्हावी, असा शरद पवारांचा राजकीय होरा दिसतो आहे.

 शिंदे सरकारचे स्थैर्य परवडणार नाही

शिंदे फडणवीस यांचे सरकार राजकीय दृष्ट्या कन्सोलीडेट होण्यापूर्वीच त्यामध्ये खोट उत्पन्न करून ते सतत अस्थिर कसे राहील हे पाहण्याकडे देखील शरद पवारांचा कल आहे. एकदा शिंदे फडणवीस सरकार कन्सोलीडेट झाले तर गेल्या अडीच वर्षात गोळा केलेल्या साधनसंपत्तीने परिपुष्ट झालेली राष्ट्रवादी काँग्रेस देखील या सरकारच्या पासंगाला पुरणे कठीण आहे, याची देखील पवारांना पक्की जाणीव आहे. म्हणूनच शरद पवारांना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना मध्यावधी निवडणुका हव्या आहेत.

 साधन संपत्ती संपण्यापूर्वी वापरणे

राष्ट्रवादीने गेल्या अडीच वर्षात सत्तेचा लाभ घेऊन गोळा केलेल्या साधनसंपत्तीचा, ती संपण्यापूर्वी किंवा कमी होण्यापूर्वी नजीकच्या भविष्यात वापर आणि शिंदे फडणवीस सरकार आपला पाया मजबूत करण्याआधीच त्याला उखडून टाकण्यासाठी प्रयत्न या दुहेरी नीतीवर शरद पवार आतापासून मध्यावधी निवडणुकांची भाषा बोलत आहेत.

 भाजपचा मध्यावधी टाळण्याकडे कल

इथे देवेंद्र फडणवीस यांनी आधीच्या ठाकरे – पवार सरकारच्या संबंधित केलेल्या विधानाचा देखील संदर्भ आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, आम्ही ठाकरे – पवार सरकार पाडण्याचा प्रयत्न करणार नाही. पण ते अंर्तविरोधाने पडले तर आम्ही म्हणजे भाजप पर्यायी सरकार देईल. जनतेवर मध्यावधी निवडणुका लादणार नाही. महाराष्ट्राच्या राजकीय राजकारणात सध्या दोन ध्रुवांसारखे वावरत असलेल्या पवार आणि फडणवीस यांची मध्यावधी निवडणुकी संदर्भातली ही मते आणि वक्तव्ये आहेत.

 भाजप : स्वतःच्या टाइमिंगनुसार निवडणुका

या दोन्ही नेत्यांच्या वक्तव्यांचा नेमका राजकीय अर्थ समजून घेतला पाहिजे. मध्यावधी निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस सर्वाधिक उत्सुक किंवा उतावीळ आहे पण भाजप मात्र अतिशय धिमेपणाने आणि स्वतःच्या टाइमिंग नुसार त्या निवडणुका घ्यायला इच्छुक आहे किंबहुना केंद्र सरकारच्या मदतीने तसे घडू घडवून आणणार आहे, हाच याचा मतीतार्थ आहे!!

Why sharad Pawar is insisting on mid term polls in maharashtra??

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती