शिंदे फडणवीस सरकार : बंडखोर आमदारांवर “वॉच” ठेवल्याची रोचक कहाणी!!; पण आज तरी फसली तिची परिणीती!!


ज्यांच्या निर्धारामुळे महाराष्ट्रात शिंदे – फडणवीस सरकार अस्तित्वात येऊ शकले त्या शिवसेनेच्या 39 आमदारांवर ते गुवाहटी पासून ते गोव्यापर्यंत आणि गोव्यातून मुंबईत आल्यावर विधानसभेतही “वॉच” ठेवण्याची रोचक कहाणी आहे आणि तिचे परिणाम ही वेगवेगळे दिसले आहेत!! Goa court grants bail to 2 NCP workers held from resort where rebel Sena MLAs were lodged

गोव्यामध्ये हे आमदार या ताज हॉटेल मध्ये उतरले होते त्यात आज हॉटेलमध्ये राष्ट्रवादीचे दोन कार्यकर्ते आयडेंटिटी च्या आधारे राहायला आले होते हे गोवा पोलिसांनी उघड केले आहे सोनिया दुहान आणि श्रेय कठियाल या दोघांना गोवा पोलिसांनी अटक करून त्यांना एक दिवस पोलिस कोठडीत ठेवले. आज 20000 रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर या दोघांची गोवा न्यायालयाने सुटका केली. पण हीच ती सोनिया दुहान आहे, जिने अजित पवारांच्या बंडाच्या वेळी नरहरी झिरवाळ यांच्यासह अन्य दोन राष्ट्रवादीच्या आमदारांना हरियाणातील गुरुग्राम च्या हॉटेलमधून मुंबईत सुरक्षित परत आणून दाखवले होते आणि त्यांना राष्ट्रवादीच्या मूळ गोटात सामील केले होते.

शिवसेनेच्या 39 बंडखोर आमदारांमध्ये तसेच अपक्ष आमदारांनी मध्ये काही फूट पडते का? त्यांच्या हालचाली नेमक्या कशा चालू आहेत? कोण? कोणाला? कसे? केव्हा? भेटत आहे?, यावर वॉच ठेवण्याची जबाबदारी सोनिया दुहान आणि श्रेय कठियाल या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर होती अशा बातम्या आहेत. परंतु, त्याचा परिणाम फारसा झालेला दिसला नाही कारण सोनिया दुहान अजित पवारांच्या बंडाच्या वेळी जरी 3 आमदारांना मुंबईत परत आणू शकल्या असल्या तरी शिवसेनेच्या आमदारांना मात्र त्या फोडू शकलेल्या दिसत नाहीत. उलट त्यांनाच फेक आयडेंटिटीच्या मुद्द्यावर अटक सहन करावी लागली आणि गुन्हा दाखल करून घ्यावा लागला. आता हे प्रकरण इथेच थांबेल असे नाही.

– परब नार्वेकर विधानसभा गॅलरीत

असाच दुसरा “वॉच” शिवसेनेचाच माजी मंत्र्यांनी अनिल परब, मिलिंद नार्वेकर, अनिल देसाई यांनी विधानसभेत या दर्शक गॅलरीतून ठेवल्याची बातमी आली आहे. विधानसभा अध्यक्षांच्या निवडणूक उद्धव ठाकरे गटाने शिवसेनेच्या सर्व आमदारांना व्हीप बजावला होता. त्यावेळी नुसार मतदान होते का? कोणते आमदार नुसार मतदान करतात? त्यांची बॉडी लँग्वेज काय आहे?, वगैरे बाबींवर अनिल परब, मिलिंद नार्वेकर यांनी “वॉच” ठेवल्याचे या बातमीत नमूद केले आहे. पण आपल्याला अपेक्षित परिणाम होत नाही असे दिसताच ते विधानसभा गॅलरीतून निघून गेल्याचेही बातमीत नमूद केले आहे.

मूळात या पद्धतीने “वॉच”ठेवून शिवसेनेचे 39 आमदार बधतील आणि त्यात आपण कोणता वेगळा परिणाम साधू शकतो हे शिवसेना नेतृत्वाला खरेच वाटले होते??, की या मराठी माध्यमांनी बातम्यांच्या रुपाने सोडलेल्या पुड्या होत्या??, हे मात्र स्पष्ट झालेले नाही.

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर ठेवलेला हा तथाकथित “वॉच” आज तरी अध्यक्षपदाच्या निवडणूकीत फारसा सफल झालेला दिसला नाही. उद्या विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी कोण? कुणावर? कसा? केव्हा? “वॉच” ठेवेल याच्या रोचक कहाण्या कदाचित उद्या पसरवल्या जातील आणि नंतर त्या वाचल्या जातील!!

Goa court grants bail to 2 NCP workers held from resort where rebel Sena MLAs were lodged

महत्वाच्या बातम्या 

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती