विधानसभा अध्यक्ष निवडणूक : १२ आमदार गैरहजर; त्यातले सर्वाधिक 7 राष्ट्रवादीचे!!; “विशेष” काळजी घेतली का??


प्रतिनिधी

मुंबई : विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सगळ्याच पक्षांचे काही आमदार गैरहजर राहिले. पण त्यातही सर्वाधिक गैरहजर आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे 7 आमदार मतदानाच्या वेळी गैरहजर राहिले. ते अजित पवार यांचे समर्थक असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एक संशय व्यक्त केला जात आहे. Assembly Speaker Election: 12 MLAs absent; Most of them are 7 nationalists

शिंदे फडणवीस सरकारने उमेदवारी दिलेले राहुल नार्वेकर अध्यक्ष पदावर निवडून आले असले तरी आयत्या वेळेला सदनात काही गडबड होऊ नये म्हणून राष्ट्रवादीने हेतूत: आपल्या 7 आमदारांना गैरहजर ठेवले. त्यामुळे यदाकदाचित सत्ताधारी शिवसेना भाजप युतीला काही मते कमी पडली असती, तर उमेदवार धोका उत्पन्न झाला असता त्यामुळे राष्ट्रवादीने “ही काळजी” घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे!!

शिवसेनेतून ३९ आमदार फोडून शिंदे गटाने भाजपासोबत सरकार स्थापन केले, नवीन सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री पदावर नियुक्ती झाली. त्यानंतर रविवारी, ३ जुलै रोजी अध्यक्षपदाच्या निवडीसाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन भरवण्यात आले. त्यामध्ये एकूण २८७ विधानसभा सदस्यांपैकी १२ सदस्य गैरहजर होते, त्यातील २ भाजप, २ काँग्रेस, ७ राष्ट्रवादी आणि एमआयएमच्या एका आमदाराचा समावेश होता.

  • अजित पवार यांचे समर्थक गैरहजर
  • निवडणुकीमध्ये समाजवादी पक्ष आणि एआयएमचे तीन आमदार मतदानात तटस्थ राहिले.
  • शिरणगतीमध्ये राहुल नार्वेकर यांना 164 मते मिळाली, तर राजन साळवी यांना 107 मते मिळाली.
  • बहुजन विकास आघाडी, मनसे आणि अपक्ष आमदारांनी भाजपाच्या बाजूने उभे राहिले.
  • राष्ट्रवादीचे आमदार अनुपस्थित राहिल्याने राजकीय भुवया उंचावल्या.
  • माजी मंत्री नवाब मलिक आणि अनिल देशमुख जेलमध्ये असल्याने ते मतदानाला उपस्थित राहिले नाहीत.
  • माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या आईचे निधन झाल्याने ते सभागृहात येऊ शकले नाहीत.
  • पारनेरचे आमदार निलेश लंके आजारी असल्याचे बोलले जात आहे.
  • अजित पवार यांचे समर्थक मानले जाणारे बबनदादा शिंदे, खेडचे दिलीप मोहिते, पिंपरीचे अण्णा बनसोडेही मतदानासाठी अनुपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.
  • उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याच अध्यक्षतेखाली निवडणूक झाल्याने आणि निर्णयात टाकण्याची वेळ न आल्याने त्यांनी मतदानात भाग घेतला नाही.
  • कोणते सदस्य होते गैरहजर?
  • भाजपा : मुक्ता टिळक, लक्ष्मण जगताप हे दोघेही गंभीर आजारी असल्याने अनुपस्थित राहणे स्वाभाविक ठरले. राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीच्या वेळी अपवाद म्हणून त्यांना मतदानासाठी खास वैद्यकीय व्यवस्था करून भाजपने सभागृहात आणले होते.
  • काँग्रेस : प्रणिती शिंदे, जितेश अंतापुरकर
  • राष्ट्रवादी : नवाब मलिक, अनिल देशमुख, निलेश लंके, दिलीप मोहिते, दत्तात्रेय भरणे, अण्णा बनसोडे, बबनदादा शिंदे
  • एमआयएम : मुफ्ती इस्माईल

हे सदस्य गैरहजर होते.

Assembly Speaker Election: 12 MLAs absent; Most of them are 7 nationalists

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात