वृत्तसंस्था
मुंबई : हिंदी चित्रपट सृष्टीत मराठी कलाकारांना नेहमीच नोकर किंवा तत्सम दुय्यम भूमिका दिल्या जातात, अशी खंत अभिनेते अशोक सराफ यांनी व्यक्त केली. परंतु, नाना पाटेकर, स्मिता पाटील आणि अमोल पालेकर याला अपवाद ठरल्याचे त्यांनी नमूद केले. Why Marathi Actors are act as Servant in Hindi films ? ; Ashok Saraf’s grief
सराफ म्हणाले, मराठी ही अत्यंत प्रयोगशील मनोरजंनसृष्टी आहे. नाटक, मालिका की चित्रपट मराठी पटकथांना फार महत्त्व दिले जाते. मराठीत कथाच खरी हिरो असते अन् त्या अनुषंगाने कलाकारांना काम मिळते. परंतु बॉलिवूडमध्ये तसे नाही. त्या ठिकाणी हिरोंना अधिक महत्त्व दिले जाते.
रोल साध्या माणसाचा असला तरीदेखील हिरो रुबाबदार, सुंदर असा दिसतो. अर्थात ग्लॅमर हाच बॉलिवूडचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे मराठीतील अनेक कलाकार त्यांच्या या व्याखेत बसत नाही, असे परखड मत अशोक सराफ यांनी नुकतेच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान व्यक्त केले. मराठीतील अनेक लोकप्रिय कलाकार बॉलिवूडला नको आहेत. त्यामुळे मराठी कलाकारांना नेहमीच नोकर किंवा तत्सम दुय्यम भूमिका दिल्या जातात, असे मत त्यांनी व्यक्त केले. त्याला नाना पाटेकर, स्मिता पाटील आणि अमोल पालेकर अपवाद ठरल्याचे त्यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App