वृत्तसंस्था
सोलापूर : बनावट मिळकतपत्र बनविणाऱ्या पाच जणांच्या टोळीचा सोलापुरात पर्दाफाश करण्यात यश आले असून त्यांच्यावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यामध्ये नगरभूमापन कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांसह पाचजणांचा या टोळीत समावेश आहे. A gang of five people making fake property document exposed in Solapur; Crime in the police
विश्वनाथ हिरालाल भांडेकर, मल्लीनाथ बसप्पा तोटद (कर्मचारी), मल्लीनाथ हणमंतराव अयलेर, अनिरुद्ध ज्ञानेश्वर निरगुडे, राजू महादेवसा बिद्री (सर्व रा. सोलापूर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला.
सोलापूर येथील नगरभूमापन कार्यालयात विश्वनाथ हिरालाल भांडेकर हे शिरस्तेदार तर मल्लीनाथ बसप्पा तोटद हे शिपाई आहेत. या दोघांनी मिळकतदार मल्लीनाथ अयलेर, अनिरुद्ध निरगुडे, राजू बिद्री यांच्याशी संगनमत करून शासकीय दस्तऐवजांत बनावट नोंदी केल्याचे उघड झाले आहे.
मिळकतपत्रात खाडाखोड करून मिळकतदारांची नवीन मिळकतपत्रे तयार केली. त्यामुळे शासनाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर नगरभूमापन अधिकारी किरण अशोक कांगणे यांनी सदर बाजार ठाण्यात फिर्याद दिली. या पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.दरम्यान, या प्रकरणातील शिरस्तेदार विश्वनाथ भांडेकर यांची पुण्यातील कार्यालयात नुकतीच बदली झाली आहे. फौजदार तोटदार तपास करीत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more