वृत्तसंस्था
नवी दिल्ली : एकाच वेळी ३० जणांना व्हिडिओ कॉल करता आला तर मजा येणार आहे. त्यासाठी टेलिग्रामकडून जबरदस्त फीचर लॉंच करण्यात आले आहे. विशेषतः कोरोना काळातील लॉकडाऊनमध्ये तरुणाईला आणि विद्यार्थाना लाभदायक ठरणार आहे. At One Time make video calls to 30 persons ; Telegram launch tremendous feature
व्हॉट्सअॅप आणि झूमला टक्कर देण्यासाठी टेलिग्रामने जबरदस्त फीचर लाँच केले आहे. कंपनीने युजर्ससाठी हे नवीन फीचर जोडले आहे. ज्यात ते ग्रुप चॅट्सना व्हिडिओ कॉन्फरन्स कॉलमध्ये तुम्ही कन्व्हर्ट करू शकता. टेलिग्रामचे हे अपडेट अँड्रॉईड आणि आयओएस अॅपसाठी लाँच केले आहे. टेलिग्रामवरून एकाच वेळी३० जणांना व्हिडिओ कॉल करता येणार आहे.
सध्या काही कालावधीसाठी त्याचा वापर करता येणार आहे. परंतु ही लिमीट वाढवली जाणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. व्हिडीओ कॉल सुरू असताना एखाद्या सहभागी व्यक्तीच्या स्क्रीन बॉक्सवर टॅप करून त्याला फूल स्क्रीन करणेदेखील आता शक्य होणार आहे. विशिष्ट युझरला पिन करणेही शक्य होणार आहे. आता या वैशिष्ट्यपूर्ण सुविधेचा कोण किती लाभ घेतो,हे आगामी काळ ठरवेल.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more