औरंगाबाद: व्याख्या वुख्खी वुख्खू …काय गोंधळलात का?हे तर ट्रेड मार्क आहे …धनंजय माने इथंच राहतात का? यासारखं ….हा माझा बायको सह सौदामिनी आधी कुंकू लाव …हे आहेत अजरामर झालेले डाॅयलॉग …. अशी ही बनवाबनवी’, ‘माझा पती करोडपती’, ‘बिनकामाचा नवरा’, ‘एक उनाड दिवस’ अशा चित्रपटातून दमदार भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे ‘मामा’ अर्थात अशोक सराफ यांना कोण ओळखत नाही? अशोक सराफ दीर्घ दशकापासून मनोरंजन विश्वात सक्रिय आहेत. आज (4 जून) अशोक सराफ आपला 74 वा वाढदिवस साजरा करत आहेत. EXCLUSIVE ASHOK SARAF @ 74: I started crawling on stage… and much more … heartfelt chat with Mama Ashok Saraf!
मराठी चित्रपटसृष्टीत अभिनयाचा स्वतंत्र ठसा उमटविणारे प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ यांचा आज वाढदिवस असून त्यांनी वयाची 74 वर्षे पूर्ण केली आहे. ५० हून अधिक वर्ष मामांनी मनोरंजन सृष्टीवर अधिराज्य गाजवलं आहे. त्यानिमित्ताने THE FOCUS INDIA ने अशोक सराफ उर्फ मामांची विशेष मुलाखत घेतली.
मूळचे बेळगावचे असणाऱ्या अशोक सराफ यांचा जन्म मुंबईत झाला. दक्षिण मुंबईतील चिखलवाडी या भागात त्यांचे बालपण गेले.त्यांचे नावच अशोक कुमार यांच्या नावावरून ठेवण्यात आले असल्याने की काय त्यांना अभिनयाची आवड होती . अभिनयाचे बाळकडू देखील घरातूनच मिळाले त्यांचे मामा म्हणजे प्रख्यात संगीत नट गोपीनाथ सावकार हे होत. अशोक सराफ यांचे शिक्षण मुंबईतील डी.जी.टी. विद्यालयात झाले.
त्यांना सुरुवातीपासूनच नाटकांची अतिशय आवड होती. वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी शिरवाडकरांच्या ‘ययाती आणि देवयानी’ या नाटकातील विदूषकाच्या भूमिकेद्वारा व्यावसायिक रंगभूमीवर प्रवेश केला. काही संगीत नाटकांतूनदेखील त्यांनी भूमिका केल्या.या सृष्टित प्रवेशाची रंजक कहानी खुद्द अशोक सराफ यांनीच उलगडली …
The Focus India:सर्वप्रथम मामा आपल्याला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा!मामा आपण रंगभूमीवर कशी एंट्री घेतली ?आपल्याला या क्षेत्रात येण्यासाठी घरच्यांचाच विरोध होता मग ते कसे तयार झाले?
अशोक सराफ: मी रंगमंचावर आलो नाही तर रांगायलाच लागलो. माझे मामा प्रख्यात संगीत नट प्रसाद सावकार हे आमच्या घरीच राहायचे. त्यांची स्वत:ची नाटककंपनी होती. त्यामुळे अभिनयाचं बाळकडू घरातूनच मिळत होतं.मात्र माझे वडिल आणि मामा यांना मी या क्षेत्रात येऊ नये असच वाटत होतं. त्याला कारणही तसंच होतं. ६० च्या दशकात या क्षेत्रात शाश्वत अस काही नव्हतं म्हणजे या हे क्षेत्र तेजीत नव्हतं!.माझ्या वडिलांनाही मी शिकून नोकरी करावी आणि फावल्या वेळेत नाटकात काम करावं असंच वाटत होतं. मग 10 वर्ष SBI मध्ये नौकरी केली तिथे मन रमत नाही कधी सुट्टी कधी हाफ डे अस करून नाटक पाहणे सुरू होते .
Turning point :
ययाती आणि देवयानी नाटकातील भूमिका-400 जून अधिक प्रयोग
प्रसाद सावकारांच्या ययाती आणि देवयानी या नाटकाचा दौरा गोवा,बेळगांव या भागात सुरू होता. याचदरम्यान या संगीत नाटकात विदूषकाची भूमिका करणाऱ्या कलाकाराची तब्येत अचानक बिघडली. एेन दौऱ्यात विदूषकाची भूमिका कोण करणार .मी या नाटकाची तालीम सुरू असताना प्रॉम्पटरचं काम करायचो. त्यामुळे नाटकातील पूर्ण संवाद खडानखडा पाठ होते. आणि अभिनय करण्याची प्रचंड आवड होतीच.
सावकारांनी मला तातडीन मुंबईतून बेळगांवला बोलावले. आणि मी ययाती आणि देवयानी या नाटकातील विदूषकाची भूमिका केली. कामाचं प्रचंड कौतुक झालं. अखेरीस ज्या मामांनी मला विरोध केला होता त्यांनीच माझ काम पाहून विदूषकाचा रोल यापुढे तुच करशील असं सांगितलं.
अश्याप्रकारे रंगभूमीवर एंट्री झाली ….
क्रमश:
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more