स्मरणशक्ती म्हणजे नक्की काय असते


मानवी मेंदूचे विविध भाग म्हणजे कॉर्पस कॅलोझम, सेरेब्रल कॉर्टेक्स, थल्यमस, हायपोथलॅमस, हिप्पोकॅम्पस, सेरेबेलम, ब्रेन-स्टेम. या विविध भागांवर मेंदूची विविध कार्यें अवलंबून असतात. उदा. जागृती, चेतना-उत्पत्ती, जाणीव, देहभान, निर्णय प्रक्रिया, कामाची अंमलबजावणी, भाषा-उत्पत्ती व वाढ, शिक्षण, समज, योजना कार्यान्वित करणे, प्रश्न सोडवणे किंवा उत्तर शोधून काढणे, विचार-प्रक्रिया अशी अनेक कार्ये मेंदूवर अवलंबून असतात. What exactly is memory?

मेंदूचे संक्षिप्त स्वरूपांत कार्ये सांयची झाल्यास ही यादी फार मोठी होवू शकते. चेतना उत्पन्न करणे, लक्ष, अवधान जाणीव असणे, निर्णय घेणे, अंमलबजावणी करणे, स्मृती किंवा आठवण, एकमेकाला अनुकूल क्रिया करणे, एखाद्या गोष्टीचे होणारे ज्ञान मिळवणे, योजना तयार करणे, प्रश्नाचा उलगडा करणे, कल्पना, विचार करणे, संस्मरणीय अशी स्मृती अथवा स्मरणशक्ती पूर्णतः मेंदूतील विशिष्ट भागावर अवलंबून असते. स्मरणशक्ती हे मनाचे बुद्धिसामर्थ्य आहे.

ती जणू मनाची बुद्धिशाखा आहे; ज्यायोगे कोणतीही प्राप्त माहिती सांकेतिक भाषेत साठवली जाते व जेव्हा जरूर असेल तेव्हा पूर्वस्थितीत प्राप्त केली जाते. ही एक मेंदूची विशिष्ट धारणा-शक्ती असते. प्रथम मेंदू, अग्रेषित झालेली माहिती स्वतःजवळ ठेवून घेतो व भविष्य काळात जेव्हा गरज असेल तेव्हा योग्य प्रकारे त्याच्या उपयोग करून घेतो. या कार्यप्रणालीला वैद्यकीय भाषेत लिम्बिक सिस्टीम असे म्हणतात. गतकालीन गोष्टी स्मरणात राहिल्या तरच भाषा वृद्धी, आपसातले नातेसंबंध, स्वतःची ओळख किंवा व्यक्तिमत्व प्रकट होणे शक्य असते. सुखकारक आयुष्यासाठी हे महत्वाचे असते.

स्मरणशक्ती म्हणजे काय असते हेही माहिती असायला पाहिजे. बाह्यजगतातील माहिती प्रथम विशिष्ट प्रक्रियेद्वारे प्राप्त केल्यावर मेंदूच्या एका ठराविक भागात संग्रहित केली जाते व जेव्हां आवश्यक असेल तेव्हां पुन्हा प्राप्त केली जाते. अशा रीतीने एक चक्र पूर्ण होते. हे एक चक्र पूर्ण होण्यासाठी मेंदूमध्ये अनेक भौतिक व रासायनिक प्रक्रिया घडतात. वरवर पाहता ही क्रिया जितकी साधी वाटते तितकीच ती गुंतागुंतीची असते. स्मृतिप्रक्रिया साधी, सरळ, स्वयंपूर्ण नसते. तिच्यातही अधून-मधून बिघाड होऊ शकतात. माहितीची प्राप्ती, साठवण व पुनर्प्राप्ती या क्रिया दूषित होऊ शकतात.

What exactly is memory?

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात