Volcano Eruption : कांगोमध्ये ज्वालामुखीचा उद्रेक , 15 जणांचा मृत्यू ; 500 हून जास्त घरांचे नुकसान


वृत्तसंस्था

गोमा : पूर्व कांगोमध्ये ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यामुळे अनेक खेड्यांवर परिणाम झाला आहे. तब्बल 500हून अधिक घरं नष्ट झाली असून 15 जणांचा मृत्यू झाला आहे. Volcanic eruption in Congo, 15 killed ; more than 500 homes Damaged

मध्य आफ्रिकेत कांगो हा देश वसला आहे. पूर्व कंगोतील गोमा या शहराजवळचा ज्वालामुखी माऊंट नीरागोंगोचा शनिवारी उद्रेक झाला. ज्यामुळं 5 हजार नागरिक घाबरून स्थलांतरीत झाले आहेत 25 हजार जणांनी उत्तर पश्चिमेकडेच्या साके शहरात शरण घेतली.



170 मुलं बेपत्ता झाल्याचे वृत्त आहेअशा मुलांच्या मदतीसाठी शिबिराची व्यवस्था केली आहे. यापूर्वी 2002 मध्ये या ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता. यामघ्ये शेकडो जणांचा मृत्यू झाला होता. तर, 1 लाखाहून अधिक नागरिक बेघर झाले होते.

लाव्हारसाचे तांडव आणि जीवाचा अकांत

ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर लाव्हारस बाहेर पडण्यास सुरुवात झाली. धूर, धुळीचं साम्राज्य पसरले. धगधगता लाव्हारस उताराकडे नागरी वस्तीकडे पसरू लागला. जीव वाचवण्यासाठी आक्रोशानं एकच गोंधळ उडाला.

Volcanic eruption in Congo, 15 killed ; more than 500 homes Damaged

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात