दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटीशांच्या सत्तेवरचा सूर्य मावळला आणि जगाची विभागणी अमेरिका आणि रशिया म्हणजेच भांडवलशाही राष्ट्रे आणि कम्युनिस्ट अशी झाली. या वाटणीत चीनला रशियाचा पाठींबा असल्याचे अमेरिकेला वाटत होते. त्यामुळेच चीनच्या विस्तारवादी महत्त्वाकांक्षेला धुमारे फुटून तैवान गिळण्याचा त्यांचे प्रयत्न अमेरिका यशस्वी होऊ देणार नव्हती. कम्युनिस्ट चीनला धडा शिकवण्यासाठी 1958 मध्ये शांघायपर्यंत घुसून अणूहल्ला करण्याची तयारी अमेरिकेने ठेवली होती. ऑनलाईन खुल्या केलेल्या ‘टॉप सिक्रेट क्लासीफाईड डॉक्युमेंट्स’मधून हा धक्कादायक खुलासा झाला आहे. न्यूयॉर्क टाईम्सने या संदर्भातले वृत्त दिल्यानंतर एकच खळबळ माजली. US considered nuclear strike on China in 1958 over Taiwan, documents show. Former military analyst Daniel Ellsberg posted online the classified portion of a top-secret document
वृत्तसंस्था
वॉशिंग्टन : कम्युनिस्टांच्या आक्रमक हालचालींपासून तैवानचे संरक्षण करण्यासाठी सन 1958 मध्ये चीनच्या मेनलँडवर अणुबॉंब टाकण्याचा सल्ला अमेरिकेच्या रणनितीकारांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना दिला होता.
डॅनीयल एल्सबर्ग यांनी “पेंटागॉन पेपर्स” या नावाने नुकत्याच ऑनलाईन पोस्ट केलेल्या वर्गीकृत दस्ताऐवजातून (क्लासिफाईड डॉक्यूमेंट्स) हा तपशील खुला झाला आहे. चीनला सोव्हिएट रशियाचा पाठींबा आहे. त्यामुळे अमेरिकेच्या चीनवरील अणू हल्ल्यानंतर रशियाकडून प्रत्युत्तर दिले जाऊ शकते, असेही अमेरिकी रणनितीकारांनी गृहीत धरले होते. मात्र कम्युनिस्टांना तैवानचा घास घेण्यापासून रोखण्यासाठी हा धोका पत्करला पाहिजे असे त्यांचे मत होते. डॅनीयलने खुल्या केलेल्या या गोपनीय कागदपत्रां संदर्भातले पहिले वार्तांकन न्यूयॉर्क टाईम्सने केले आहे. त्यानंतर एकच खळबळ माजली आहे.
डॅनियल एल्सबर्ग हे स्वतः माजी लष्करी विश्लेषक आहेत. तैवान-चीन संदर्भातील टॉप सिक्रेट म्हणून गोपनीय ठेवलेल्या कागदपत्रांचा काही तपशील एल्सबर्ग यांनी ऑनलाईन पोस्ट केला. एल्सबर्ग हे आता नव्वद वर्षांचे आहेत. पेंटॅगॉन पेपर्स या नावाने अमेरिकेसाठी टॉप सिक्रेट असणारी व्हिएतनाम युद्धावरील कागदपत्रे 1975 मध्ये एल्सबर्ग यांनीच अमेरिकी प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचवली होती. त्यामुळे ते एकदम प्रसिद्धीच्या झोतात आले होते. त्यानंतर आता त्यांनी अमेरिकेच्या कथित अणुहल्ल्याविषयीची कागदपत्रे फोडली आहेत.
एल्सबर्ग यांनी न्यूयॉर्क टाईम्सला सांगितले की, तैवान संघर्षावरील अभ्यासाची कागदपत्रे त्यांनी 1970 मध्ये मिळवली. सध्या तैवानच्या मुद्यावरुन अमेरिका आणि चीन यांच्यात पुन्हा तणाव वाढू लागल्याच्या पार्श्वभूमीवर मी ती जाहीर करत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
कम्युनिस्ट चीनने तैवानवर आक्रमण केले असते तर अमेरिकेने चीनविरोधात अण्वस्त्रांचा वापर केला असता. तैवान विरोधातली चीनची हवाई मोहिम हाणून पाडण्यासाठी चीनी हवाई तळ उध्वस्त करायचे असा निर्धार तत्कालीन जॉईंट चीफ ऑफ स्टाफचे अध्यक्ष जनरल नाथन ट्वीनींग यांनी केला होता. एल्सबर्ग यांनी फोडलेल्या गुप्त कागदपत्रांमध्ये ही माहिती आहे.
मात्र हवाई तळ उध्वस्त केल्यानंतरही चीनचे तैवानवरील आक्रमण थांबले नसते तर उत्तर चीनमध्ये अगदी शांघायपर्यंत खोलवर घुसून अण्वस्त्र हल्ला करण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे मत ट्विनींग यांचा दाखला देत याच गोपनीय दस्ताऐवजात स्पष्ट करण्यात आले आहे. या संघर्षात तत्कालीन अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डी. आयसेनहोवर पारंपरिक शस्त्रास्त्रांच्या वापरावर अवलंबून राहण्याच्या मताचे होते. प्रत्यक्षात सन 1958 मध्ये चीनी तोफांच्या माऱ्यानंतर हा संघर्ष थांबला. चँग शेकच्या राष्ट्रीय फौजांनी या परिसरावर ताबा मिळवला.
चीन तैवानला आजही बंडखोर प्रदेश मानतो. सैन्यबळाचा वापर करुन हा भाग केव्हा ना केव्हा मुख्य चीनशी जोडून घेण्याचे चिनी राज्यकर्त्यांचे स्वप्न आहे. वॉशिंग्टनने बिजिंगला (चीनची राजधानी) 1979 मध्ये मान्यता दिली पण त्यासोबतच तैपेई बरोबरचे संबंधही अमेरिकेने कायम उत्तम राखले आहेत. या भागातील अमेरिकेचा लष्करी साथीदार म्हणून तैपेईकडे पाहिले जाते. चीनवर टांगती तलवार ठेवण्याचा अमेरिकेचा हा प्रयत्न मानला जातो.
अलीकडच्या काही महिन्यात चीनच्या हवाई दलाने तैवानच्या हवाई क्षेत्रातील घुसखोरी वाढवली आहे. त्यामुळे तैवानला बळ देण्यासाठी अमेरिकाही ‘फ्रिडम ऑफ नेव्हिगेशन’ या मोहिमेअंतर्गत तैवानच्या सामुद्रधुनीत सातत्याने शक्तीप्रदर्शन करत असते. अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन हे चीनसंदर्भातले आपले धोरण लवकरच जाहीर करण्याची शक्यता आहे. तैवानचे संरक्षण करण्याची स्पष्ट भूमिका त्वरीत जाहीर करण्यासाठी बायडेन यांच्याकडून लोकांना असणाऱ्या अपेक्षा वाढल्या आहेत.
संघर्षाच्या क्षणी तैवानी बेटांच्या संरक्षणासाठी वॉशिंग्टनने पुढाकार घ्यावा यासाठी अमेरिकी कायद्याची आवश्यकता आहे. मात्र गेल्या काही दशकात अमेरिकेने ‘सामरिक संदिग्धते’चे धोरण अवलंबले आहे. तैवानच्या बाजूने रणात उतरण्यासाठी कोणती टोकाची परिस्थिती निर्माण झाली पाहिजे याबद्दल स्पष्ट भूमिका घेण्याचे अमेरिकेने आजवर टाळले आहे. या संदिग्थतेच्या पार्श्वभूमीवर एल्सबर्ग यांनी चीनवरील अणूहल्ल्याच्या नियोजनाची गोपनीय कागदपत्रे सार्वजनिक केल्याने त्याला महत्त्व आले आहे.
US considered nuclear strike on China in 1958 over Taiwan, documents show. Former military analyst Daniel Ellsberg posted online the classified portion of a top-secret document
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App