नाशिक : हिट अँड रन संदर्भात केंद्र सरकारने केलेल्या कठोर कायद्याला विरोध करत ट्रक चालकांनी पुकारलेल्या आंदोलनाचा 10 राज्यांमध्ये प्रभाव पडल्याचे दिसून येत असून अनेक ठिकाणी पेट्रोल डिझेलचा साठा संपत आल्याच्या बातम्या आहेत, तसेच भाजीपाला आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे महागाईची झळ वाढल्याच्याही बातमी काही माध्यमांनी दिल्या आहेत पण त्या पाठोपाठ सोशल मीडियावर राहुल गांधींचा ट्रकमध्ये बसलेले फोटो प्रचंड व्हायरल झाले आहेत.Truckers strike, impact in 10 states; Rahul Gandhi’s truck photo is going viral!!
नाशिक मध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करुन ट्रक चालकांचे आंदोलन थांबून मनमाड डेपो मधून होणारा मधून डिझेल आणि पेट्रोलच्या पुरवठा सुरळीत केल्याची बातमी समोर आली आहे. पण तरी देखील ट्रक चालकांचे हे आंदोलन केवळ हीट अँड रन केस कायद्याच्या विरोधात तीव्र भावना व्यक्त करणारे आहे किंवा नाही याविषयी दाट संशय निर्माण करणारे आहे.
सीएए, एनआरसी कायद्याच्या विरोधातील आंदोलन, त्या पाठोपाठ काही महिन्यांमध्येच दिल्लीच्या कोंडी करण्यासाठी केलेले शेतकरी आंदोलन, कुस्तीगिरांचे आंदोलन आणि त्यानंतर आता ट्रक चालकांचे आंदोलन यामधून काँग्रेसचे टूलकीट पुन्हा ऍक्टिव्हेट झाल्याचे सोशल मीडियावर बोलले जात आहे. सीएए, एनआरसी विरोध, कृषी कायद्यांना विरोध, कुस्तीगीरांचे आंदोलन आणि आता ट्रक चालकांचे आंदोलन यातली सर्व मोडस ऑपरेंडी समान आहे. देशातली सर्व पुरवठा साखळी तुटावी, तिच्यात मोठा व्यत्यय निर्माण व्हावा त्यातून फार मोठे जनआंदोलन पेटल्याचे दाखविता यावे ही ती मोडस ऑपरेंडी आहे.
काही महिन्यांपूर्वी राहुल गांधींनी अचानक ट्रक चालकांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. त्यांच्या समवेत ट्रक मधून काही किलोमीटरचा प्रवास केला होता. ट्रक चालकांच्या समस्या आपण जाणून घेतल्याचे ट्विट त्यावेळी राहुल गांधींनी देखील केले होते. परंतु त्याचवेळी अनेकांनी “नव्या आंदोलनाची, नवी चुणूक” असा इशाराही सोशल मीडियावर दिला होता. तो आता प्रत्यक्षात उतरताना दिसत आहे. ट्रक चालकांचे आंदोलन अवघ्या दोन दिवसांमध्ये 10 राज्यांमध्ये प्रभाव टाकून जात आहे. ट्रक चालकांनी केंद्र सरकारला कृषी कायद्यांच्या विरोधात केलेले शेतकरी आंदोलनाची आठवण करून दिली आहे.
22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येतल्या राम जन्मभूमी मंदिरात श्रीराम लल्लांची प्राणप्रतिष्ठा होत आहे? देशात आणि परदेशात त्यासाठी भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित केले आहेत. सगळीकडे त्याचा प्रचंड उत्साह देखील पसरतो आहे. पण या पार्श्वभूमीवर ट्रक चालकांचे आंदोलन अचानक उभे राहिल्याने काँग्रेसच्या विशिष्ट मोडस ऑपरेंडीबद्दल दाट संशय तयार झाला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App