मोदींच्या तामिळनाडू दौऱ्यापाठोपाठ सुपरस्टार रजनीकांत यांना अयोध्येतील कार्यक्रमाचे निमंत्रण!!

वृत्तसंस्था

चेन्नई : अयोध्या श्रीराम मंदिराच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमाचे अक्षत वाटप विश्व हिंदू परिषद आणि राम मंदिर ट्रस्टने अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने सुरू केली असून देशातल्या अनेक सेलिब्रिटींना या सोहळ्यात सहभागी करून घेण्यासाठी विश्व हिंदू परिषद काम करत आहे.Superstar Rajinikanth invited to Ayodhya event after Modi’s Tamil Nadu tour!!



पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आजचा तामिळनाडूचा दौरा झाल्याबरोबर सायंकाळी विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते सुपरस्टार रजनीकांत यांच्या घरी पोहोचले आणि त्यांना राम मंदिरातल्या सोहळ्याचे निमंत्रण दिले. पंतप्रधान मोदींनी आज त्रिची विमानतळाचे उद्घाटन केले भारतीदासन विद्यापीठातल्या पदवीदान समारंभाला त्यांनी हजेरी लावली. त्यानंतर आज सायंकाळी विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते रजनीकांत यांना निमंत्रण द्यायला त्यांच्या घरी गेले होते. त्यामुळे तामिळनाडूतला आजचा दिवस मोदींचा दौरा आणि रजनीकांत यांना अयोध्येच्या कार्यक्रमाचे निमंत्रण या भोवती फिरत राहिला.

रजनीकांत यांनी काही महिन्यापूर्वीच अयोध्या दौरा केला होता. “जेलर” सिनेमा रिलीज होताना रजनीकांत यांनी अयोध्येत जाऊन श्री राम लल्लांचे आणि हनुमान गढी येथे श्री हनुमंताचे दर्शन घेतले होते. लखनऊ मध्ये त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेऊन त्यांच्या समवेत “जेलर” सिनेमा पाहिला होता. त्यानंतर त्यांनी समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांची देखील भेट घेतली होती. “जेलर” सिनेमा उत्तर भारतात सुपर डुपर हिट ठरला होता.

त्यानंतर आता विश्व हिंदू परिषदेने 22 जानेवारीच्या अयोध्येतील या कार्यक्रमाचे निमंत्रण दिल्यामुळे रजनीकांत पुन्हा एकदा उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर जाणार आहेत. रजनीकांत हे महावतार बाबा आणि रामकृष्ण परमहंस यांचे भक्त आहेत. आपल्या घरातील या दोन्ही महान विभूतींच्या समोरच रजनीकांत यांनी अयोध्येतील श्रीराम मंदिराचे निमंत्रण स्वीकारले.

Superstar Rajinikanth invited to Ayodhya event after Modi’s Tamil Nadu tour!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात