पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे विचारधन!!, त्यांच्याच सहज सुंदर भाषेत!!


पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची आज जयंती आहे. यानिमित्त भारतीय राष्ट्रीय एकात्मतेविषयी त्यांनी मांडलेले विचार अतिशय मोलाचे आहेत. ते त्यांच्याच सहज सुंदर भाषेत :Thoughts by Pandit Deendayal Upadhyay!!, in his own simple and beautiful language!!

आपली मूलभूत राष्ट्रीय ओळख विसरणे हे भारताच्या समस्यांचे प्रमुख कारण आहे. • भारतीय स्वातंत्र्य तेव्हाच सार्थक होईल, जेव्हा ते संस्कृतीच्या अभिव्यक्तीचे साधन बनेल आणि भारतीय संस्कृतीचे हे मूळ वैशिष्ट्य आहे की ती जीवनाकडे विशाल आणि सम्यक रूपाने पाहायला शिकवते.
 • अनेकतेत एकता आणि विभिन्न रूपांमध्ये एकता हा भारतीय संस्कृतीचा मुख्य विचार आहे.
 • “रिलीजन” शब्दाचा अर्थ “पंथ” किंवा “संप्रदाय” असा आहे. त्या शब्दाचा अर्थ “धर्म” असा कधीच होऊ शकत नाही.
 • आपण आपला स्वभाव धर्माच्या सिद्धांतावर आधारित बदलतो, तेव्हा आपल्याला संस्कृती आणि सभ्यता प्राप्त होते.
 • धर्म हा एक खूप व्यापक आणि विस्तृत विचार आहे. समाजाच्या धारणे विषयी सर्व पैलूंचा त्यामध्ये अंगभूत विचार आहे.
 • भारतीय जीवनात विविधता आणि बहुलता खूप आहे. परंतु आम्ही त्या मागची ऐक्य भावना शोधण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे.
 • धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यांची प्राप्ती करण्याची इच्छा मनुष्यामध्ये जन्मजातच आहे. ती समग्र रूपाने मिळवणे यामध्ये भारतीय संस्कृतीचे सार आहे.
 • आमच्या राष्ट्रीयतेचा आधार “भारत माता” आहे. फक्त “भारत” नाही. यातून “माता” हा शब्द बाजूला कराल, तर भारत हा फक्त एक जमिनीचा तुकडा उरेल.
 • पाश्चात्य विज्ञान आणि पाश्चात्य जीवन या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पाश्चात्य विज्ञान स्वतंत्र आणि सार्वभौम आहे. ते आपण आत्मसात केले पाहिजे. पण पाश्चात्य जीवनाच्या बाबतीत मात्र ही बाब सत्य मानता येणार नाही.

Thoughts by Pandit Deendayal Upadhyay!!, in his own simple and beautiful language!!

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*  मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय