WATCH : दोन मराठी राज्ये व्हावीत; ही विदर्भाची इच्छा; विदर्भाच्या शोषणावर महाराष्ट्राचा झगमगाट-नेवले


विशेष प्रतिनिधी

नागपूर : विदर्भाच्या शोषणातून महाराष्ट्राचा झगमगाट सुरू आहे. कोळसा आमच्याकडे मात्र विज मुंबईला,कापूस आमचा मात्र गिरण्या मुंबईत, नद्या, धरणे विदर्भाचे विजेचे उत्पादन मात्र मुंबईत हे आता चालणार नाही. अजूनही वेळ गेली नाही, ज्या भाजपने वेगळ्या विदर्भाच्या नावावर सत्ता काबीज केली त्यांनी आतातरी थोडी. ठेवून वेगळा विदर्भ करावा. अन्यथा जनता आता तुम्हाला विदर्भातून हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही. असा ईशारा जय विदर्भ पार्टीचे मुख्य संयोजक राम नेवले यांनी दिला.There should be two Marathi states; This is the wish of Vidarbha

स्वतंत्र विदर्भ आंदोलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच स्वतंत्र विदर्भ आंदोलन समितीचे विलीनीकरण करून जय विदर्भ पार्टी स्थापन केली. या सदंर्भात माहिती देण्यासाठी ते बुलडाणा येथे आले असता पत्रकारांशी वार्तालाप करीत होते. यावेळी बोलताना नेवले म्हणाले की, गेल्या अनेक वर्षापासून आम्ही वेगळया विदर्भासाठी संघर्ष करीत आहोत. आमचा लढा सुरूच आहे मात्र आता स्वतंत्र विदर्भ आंदोलन समिती बरोबरच राजकीय पक्ष काढून आम्ही आमची ताकद दाखवून देणार आहोत.

त्यासाठी येणाऱ्या महा नगर पालिका, नगर पालिका व जिल्हा परिषदांचा निवडणूका जय विदर्भ पार्टीवर लढवून एक नवा पर्याय उभा करणार आहोत.विदर्भात जल,जंगल व मोठया प्रमाणावर खनिज उपलब्ध आहे. इथली माती सोनं पिकविते मात्र आतापर्यंत आमच्याच शोषणातून पश्चिम महाराष्ट्राचा विकास झाला आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे सभागृहात मी वेगळा विदर्भ देणार नाही अशी गर्जणा करतात तेव्हा आमच्या विदर्भातील ६२ आमदार खाली मान घालून बसतात.यावर एकाचीही ब्र शब्द बोलण्याची ताकद होत नाही. याला कारण हे सर्व आमदार लाचार आहेत.आता ही लाचारी खपून घेतल्या जाणार नाही..

  •  दोन मराठी राज्ये व्हावीत;ही विदर्भाची इच्छा
  •  जय विदर्भ पार्टीचा स्वतंत्र विदर्भाचा आग्रह
  •  विदर्भाच्या शोषणातून महाराष्ट्राचा झगमगाट
  • कोळसा आमच्याकडे मात्र विज मुंबईला
  •  कापूस आमचा मात्र गिरण्या मुंबईत
  •  नद्या, धरणे विदर्भाचे विजेचे उत्पादन मात्र मुंबईत
  • There should be two Marathi states; This is the wish of Vidarbha

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात