चोरी ४,२५० कोटींची, तीही चक्क किरणोत्सर्गी पदार्थांची, एक ग्रॅमची किंमत तब्बल १७० कोटी, चोरट्यांना अटक पण चोरी कोणत्या प्रयोगशाळेतून सापडेना


विशेष प्रतिनिधी

कोलकाता : तब्बल ४२५० कोटी रुपयांची चोरी, तीही चक्क किरणोत्सर्गी पदार्थांची, चोरट्यांना पकडले पण चोरी कोठून झाली हेच अद्याप समजलेले नाही. पश्चिम बंगालमधील कोलकाता विमानतळाजवळील भागात किरणोत्सर्गी पदार्थ अवैधरीत्या बाळगल्याबद्दल सीआयडीने दोन जणांना अटक केली आहे. यातील एका पदार्थाची ग्रॅमची किंमत १७० कोटी रुपये आहे. या सगळ्या पदार्थांची किंमत ४,२५० कोटी रुपये आहे. Theft worth Rs 4,250 crore of radioactive substances, the price of one gram is Rs 170 crore, the thieves were arrested but the theft was not found from any laboratory

गुप्त खबर मिळाल्यानंतर सीआयडी अधिकाºयांनी दोन जणांना अटक केली. किरणोत्सर्गी पदार्थाच्या चार तुकड्यांची विक्री करण्यासाठी दोघांनी एकाशी संपर्क साधला होता. जप्त केलेल्या किरणोत्सगी पदार्थांच्या तुकड्यांमध्ये एक कॅलिफोर्नियम असल्याचा संशय आहे. याच्या एका ग्रॅमची किंमत सुमारे १७० कोटी रुपये आहे.

अटकेतील दोघांनी सांगितले की, त्यांनी सोशल मीडियाद्वारे संपर्क साधून एकाकडून किरणोत्सर्गी पदार्थ विकत घेतला होता. त्याचे वजन २५० ग्रॅम आहे. दोन्ही आरोपींना अणुऊर्जा कायदा व भारतीय दंड विधानाच्या विविध कलमानुसार अटक केली. ही सामग्री कोणत्या प्रयोगशाळेतून चोरण्यात आली, याचा तपास सुरू करण्यात आला आहे.

Theft worth Rs 4,250 crore of radioactive substances, the price of one gram is Rs 170 crore, the thieves were arrested but the theft was not found from any laboratory

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण