विशेष प्रतिनिधी
बंगळुरु: कर्नाटकातील एका कृषि प्रदर्शनात बैलाला तब्बल एक कोटी रुपयांची बोली लागली आहे. याचे कारण म्हणजे या बैलाच्या विर्याला शेतकऱ्यांकडून खूप मागणी आहे. विर्याचा एक डोस एक हजार रुपयांना विकला जातो.The price of bull is one crore rupees, one dose of semen is sold for one thousand rupees
बेंगळुरु येथष कृषी मेळाव्यात हा बैल विक्रीसाठी आणण्यात आला आहे. मालकाच्या म्हणण्यानुसार, या बैलाच्या वीयार्चा एक डोस तब्बल 1 हजार रुपयांना विकला जातो. त्यामुळे या मेळाव्यात हा बैल आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. आहे. लोकांनी त्याच्यासोबत भरपूर सेल्फी काढले.
कृष्णा हा हल्लीकर जातीचा बैल आहे. ज्याचं वीर्य खूप महाग आहे. सध्या शहरांमध्ये म्हशी आणि जर्शी गायींपेक्षा देशी गायींच्या दुधाला जास्त मागणी आहे. कृष्णा हा सुद्धा एक देशी गोवंश आहे. याच्यामध्ये कुठलंही मिश्रण नाही. त्यामुळेच याचं वीर्य शेतकरी हजारो रुपये देऊन विकत आहे. देशी गायींपासून मिळणारे दूध शहरांमध्ये 120 ते 150 रुपये लीटरपर्यंत विकलं जातं.
कृष्णा ज्या प्रजातीचा आहे, ती प्रजाती संपत चालली आहे. त्यामुळे देशी गोवंश वाढवण्याचा प्रयत्न कृष्णाचे मालक बोरेगौडा यांचा आहे. त्यातच हा बैल बाजारात आल्याने व्यापाऱ्यांची नजरही त्याच्यावर पडली, आणि लागलेली बोली तब्बल 1 कोटींवर जाऊन पोहचली.
कृष्णा अवघ्या साडेतीन वर्षांचा आहे. मात्र जिथं इतर दांडगे बैल 2 ते 3 लाखांना विकले जातात, तिथं कृष्णाची किंमत तब्बल कोट्यवधींवर जाऊन पोहचली आहे. या मेळाव्यात आतापर्यंत लागलेली ही सर्वाधिक बोली आहे. या बैलाचं वजन 800 ते 1 हजार किलोपर्यंत जाऊ शकते. याची लांबी साडेसहा ते 8 फुटांपर्यंत असते. योग्य काळजी घेतली तर याचं आयुष्य 20 वर्षांहून जास्त असते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App