द फोकस एक्सप्लेनर : धनखड यांचा विजय का आहे निश्चित? कसे आहे उपराष्ट्रपती निवडणुकीचे गणित? वाचा सविस्तर…

उपराष्ट्रपतिपदासाठी आज मतदान होत आहे. एनडीएकडून जगदीप धनखड आणि विरोधी पक्षाकडून मार्गारेट अल्वा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या निवडणुकीत संसदेच्या दोन्ही सभागृहांतील सदस्य मतदान करतील. सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान होणार आहे. त्यानंतर लगेच मतमोजणी केली जाईल. सायंकाळी उशिरापर्यंत निकाल हाती येईल.The Focus Explainer Why is Dhankhad’s victory certain? How is the math of the vice presidential election? Read more…

दोन्ही सदनांत एकूण 788 सदस्य आहेत. मिळालेल्या माहितीनुसार एनडीएचे उमेदवार आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल जगदीप धनखड यांची स्थिती मजबूत दिसत आहे. मार्गारेट अल्वा त्यांच्याशी स्पर्धा करत आहेत.780 इलेक्टोरल कॉलेज, 744 खासदार सहभागी होतील

सध्या लोकसभेत 543 खासदार आहेत, तर राज्यसभेच्या 245 पैकी 8 जागा रिक्त आहेत. म्हणजेच इलेक्टोरल कॉलेज 780 खासदारांचे आहे. ममतांचा पक्ष तृणमूल काँग्रेसने निवडणुकीपासून दूर राहण्याचे सांगितलेले आहे. टीएमसीकडे 36 खासदार आहेत. अशा प्रकारे 744 खासदार मतदानात भाग घेतील. जर हे सर्व खासदार मतदानात सहभागी झाले, तर बहुमताचा आकडा 372 होईल.

धनखड यांच्या विजयासाठी भाजपचीच मते पुरेशी

भाजपकडे दोन्ही सभागृहांत मिळून 394 खासदार असून ही संख्या बहुमताच्या आकड्यापेक्षा जास्त आहे. अशाप्रकारे पाहिले, तर एकटा भाजप जगदीप धनखड यांना विजय मिळवून देऊ शकतो. दुसरीकडे, जर आपण एनडीएबद्दल बोललो तर 441 खासदार आहेत, 5 नामनिर्देशितांचाही पाठिंबा मिळाला आहे. अशा प्रकारे धनखड यांच्या बाजूने 446 मते पडतील. या सर्व मतांसह एनडीएला विजयाचे अंतर वाढवायचे आहे.

धनखड यांना एनडीएशिवाय पाठिंबा

जगदीप धनखड यांची मते एनडीएच्या खासदारांपेक्षा पुढे जाताना दिसत आहेत. बीजेडी, वायएसआरसी, बसपा, टीडीपी, अकाली दल आणि शिंदे गटाचाही पाठिंबा त्यांना आहे. त्यांचे 81 खासदार आहेत.

धनखड नायडूंना मागे टाकणार

आकडेवारीनुसार, जगदीप धनखड यांना 372च्या बहुमताच्या आकड्यापेक्षा खूप जास्त मते मिळत आहेत. हा आकडा 70 टक्क्यांच्या जवळपास असू शकतो. गत उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एम. व्यंकय्या नायडू यांना सुमारे 68 टक्के मते मिळाली होती. त्यानुसार धनखड या निवडणुकीत व्यंकय्या नायडूंना मागे टाकू शकतात, असे मानले जात आहे.

मार्गारेट अल्वा यांना कोणाचा पाठिंबा?

यूपीएच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांना काँग्रेस, द्रमुक, आरजेडी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाची मते आहेत. या पक्षांच्या मतांची संख्या 139 आहे. त्यांच्याशिवाय झारखंड मुक्ती मोर्चा, टीआरएस आणि आम आदमी पक्षानेही अल्वा यांना मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. तिघांचेही 29 खासदार आहेत. शिवसेनेच्या उद्धव गटाचे नऊ खासदार अल्वा यांच्यासोबत आहेत.

The Focus Explainer Why is Dhankhad’s victory certain? How is the math of the vice presidential election? Read more…

महत्वाच्या बातम्या