271 ग्रामपंचायती निवडणूकीचा सांगावा; गावांमध्येही हिंदुत्ववादी पक्षांचा बोलबाला!!; काँग्रेस – राष्ट्रवादीचे पाये उखडले!!


महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या उठावामुळे सरकार बदलल्यानंतर झालेल्या पहिल्याच जनतेमधल्या शक्तिपरीक्षेत शिंदे गट + भाजपने शतक मारले, पण ठाकरे गटानेही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत बरी कामगिरी केली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांना जबरदस्त पीछेहाट सहन करावी लागली आहे, असे आकडेवारी सांगते आहे!! 271 ग्रामपंचायतचा निवडणूक निकालाचा राजकीय सांगावा वेगळा आहे!!Hindu nationalists parties win elections in maharashtra, shows Hindutva power in rural areas
जोपर्यंत महाराष्ट्रात शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस महाविकास आघाडीचे सरकार होते तो पर्यंत शरद पवार काहीही करू शकतात. ग्रामीण भागात त्यांची पाळेमुळे घट्ट आहेत. ते कोणताही चमत्कार करू शकतात, अशी महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात चतुराईने चर्चा घडविली जात होती. पण 271 ग्रामपंचायतच्या निवडणूक निकालाने ही चर्चा धुळीस मिळवली आहे.
आकडे बोलतात
271 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये 82 ग्रामपंचायती भाजपने, 40 पेक्षा जास्त ग्रामपंचायती शिंदे गटाने,तर 27 ग्रामपंचायती उद्धव ठाकरे गटाने जिंकल्या आहेत. राष्ट्रवादीच्या वाट्याला 53 ग्रामपंचायती, काँग्रेसच्या वाट्याला 22 ग्रामपंचायती, तर इतरांच्या म्हणजे सर्वपक्षीय अथवा अपक्षांच्या वाट्याला 47 ग्रामपंचायती आल्या आहेत.
 शहरात, गावात फक्त हिंदुत्व
याचा सरळ अर्थ असा आहे, की महाराष्ट्राच्या राजकारणात शहरी भागात तर राष्ट्रवादी अथवा काँग्रेस यांचा बोलबाला उरलेला नाहीच, पण ग्रामीण भागातही हिंदुत्ववादी पक्षांचा बोलबाला अधिक मोठ्या आवाजात होत आहे, तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचा आवाज हळूहळू क्षीण होतो आहे!!
 भाजपची दोन्ही काँग्रेसवर मात
ज्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसची नाळ ग्रामीण भागाशी जोडली होती, ती नाळ आता तुटल्याचे स्पष्ट होत आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात मुळे घट्ट रोवून उभे असणारे पक्ष होते. पण या ग्रामीण भागात भाजप सारख्या हिंदुत्ववादी आणि आत्तापर्यंत शहरी तोंडावळा मानल्या गेलेल्या पक्षाने नुसता शिरकावच केलेला नाही, तर ग्रामीण भागात राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांवर मोठ्या फरकाने मात करून दाखवली आहे. 82 ग्रामपंचायतींवर कब्जा मिळवून भाजपने आपली शहरी भागाबरोबर ग्रामीण भागातली व्यापकताही दाखवली आहे. इथे भाजपची आकारण स्तुती करण्याचा मुद्दा नाही. पण राजकीय वस्तुस्थिती जर आकडेवारी मध्ये स्पष्ट होत असेल तर ती लपवण्यातही मतलब नाही.
शिंदे गटाची कामगिरी डोळ्यात भरणारी
एकनाथ शिंदे यांचा गट भाजपच्या बरोबर गेल्याने तो ग्रामपंचायत निवडणुकीत कशी कामगिरी करतो?, याची उत्सुकता होती. शिंदे गटाने या पहिल्याच फेरीत म्हणजे 271 ग्रामपंचायतच्या निवडणुकीच्या लिटमस टेस्टमध्ये उद्धव ठाकरे गटावर मात करत त्या गटाच्या जागांपेक्षा दुपटीने जागा मिळवल्या आहेत. म्हणजे 40 पेक्षा अधिक ग्रामपंचायत कब्जा केला आहे, तर 27 ग्रामपंचायती ठाकरे गटाच्या ताब्यात आल्या आहेत. पण काहीही झाले तरी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागावर आता कोणत्या ना कोणत्या हिंदुत्ववादी पक्षाचे वर्चस्व तयार झाले आहे, हेच आकडेवारी बोलताना दिसत आहे!!
 काँग्रेस – राष्ट्रवादीचा पाया भुसभुशीत
काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचा ग्रामीण भागातला पाया देखील भुसभुशीत झाला आहे. विशेषत: काँग्रेस तर ग्रामीण भागातून पूर्णपणे राजकीयदृष्ट्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहे, हा या निकालाचा प्रमुख राजकीय सांगावा आहे. त्याचबरोबर शरद पवारांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण भागात पाळेमुळे घट्ट असलेल्या राष्ट्रवादीची पाळेमुळे देखील हलली आहेत. त्यांची राजकीय जमीन देखील भुसभुशीत झाली आहे, हा देखील सांगावा राजकीय दृष्ट्या दुर्लक्ष करता येण्याजोगा उरलेला नाही.

Hindu nationalists parties win elections in maharashtra, shows Hindutva power in rural areas

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात