Common Wealth Games 2022 : बजरंग पुनियाने कुस्तीत जिंकले सुवर्णपदक, फायनलमध्ये कॅनडाच्या कुस्तीपटूला चारळी धूळ, अंशु मलिकला रजत


वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारताच्या बजरंग पुनियाने बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या 2022 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कौतुकास्पद कामगिरी केली. बजरंग पुनियाने 65 किलो वजनी गटात कॅनडाच्या कुस्तीपटूला हरवून सुवर्णपदक जिंकले.Bajrang Punia wins gold medal in wrestling Common Wealth Games 2022, Canadian wrestler wins silver in final, Anshu Malik wins

भारताचा दिग्गज कुस्तीपटू बजरंग पुनियाने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सलग दुसरे सुवर्णपदक जिंकले आहे. त्याने फ्रीस्टाइल 65 किलो गटात कॅनडाच्या लचलान मॅकनीलचा 9-2 असा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. बर्मिंगहॅममधील कुस्तीतील भारताचे हे पहिले आणि एकूण सहावे सुवर्णपदक आहे.



बजरंगने यापूर्वी 2018च्या राष्ट्रकुल स्पर्धेतही सुवर्णपदक जिंकले होते. त्याचबरोबर 2014च्या राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य पदक जिंकले होते. यावेळचे कुस्तीतील भारताचे हे दुसरे पदक आहे. बजरंगच्या आधी अंशू मलिकने रौप्य पदक जिंकले होते.
अंशू मलिकने जिंकले रौप्यपदक
यापूर्वी भारताच्या अंशू मलिकने 57 किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकले होते. अंतिम सामन्यात सुवर्णपदक जिंकण्यापासून ती हुकली. या स्पर्धेत नायजेरियाच्या ओडुनायो अडेकुरोयेने सुवर्णपदक जिंकले.
नायजेरियाच्या ओडुनायो अडेकुरोयेने अंतिम फेरीच्या पहिल्या फेरीत चार गुण मिळवले. यानंतर अंशूने दुसऱ्या फेरीत जोरदार पुनरागमन करत चार गुण मिळवले, पण नायजेरियाच्या ओडुनायो अडेकुओरोयेनेही दुसऱ्या फेरीत दोन गुण मिळवले. अशा स्थितीत अंशूला सुवर्णपदक जिंकता आले नाही आणि अंशू मलिकला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

Bajrang Punia wins gold medal in wrestling Common Wealth Games 2022, Canadian wrestler wins silver in final, Anshu Malik wins

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात