अमित शहांकडून पोलखोल : काळ्या कपड्यांमध्ये काँग्रेसचे आंदोलन, हे तर तुष्टीकरणाचे राजकारण!!


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्यावर काँग्रेस नेत्यांनी आज 5 ऑगस्ट 2022 रोजी राजधानी नवी दिल्लीत काळे कपडे घालून जोरदार आंदोलन केले. त्याचा देशपातळीवर बराच बोलबाला झाला. काँग्रेस नेत्यांची पोलीसांनी धरपकड केली. पण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मात्र परखड शब्दांत या आंदोलनाची पोलखोल केली आहे. Congress chose this day for protest and wore black clothes because they want to give a subtle message

एएनआय वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया देताना अमित शाह म्हणाले, की आज 5 ऑगस्ट 2022 रोजी काँग्रेस नेत्यांनी काळ्या कपड्यांमध्ये आंदोलन केले. हे काँग्रेसचे मुस्लिम तुष्टीकरणाचे राजकारण आहे. 5 ऑगस्टलाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम जन्मभूमी मंदिराचे भूमिपूजन केले होते म्हणूनच काँग्रेस नेत्यांनी काळे कपडे घालून आंदोलन करण्यासाठी आजचा दिवस निवडला आणि देशाला तुष्टीकरणाच्या राजकारणाचा संदेश दिला आहे. पण हे राजकारण देशासाठी आणि काँग्रेससाठीही चांगले नाही. त्यांच्या तुष्टीकरणाच्या राजकारणामुळेच काँग्रेसची आजची दयनीय अवस्था झाली आहे.

– ईडीला सहकार्य करावे

नॅशनल हेराल्ड केस मध्ये ईडीला हवाला रॅकेट लिंक सापडली आहे. या प्रकरणात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांच्या चौकशीच्या निमित्ताने अनेक खुलासे होत आहेत. त्यांनी ईडीच्या तपासाला सहकार्य केले पाहिजे. सत्य बाहेर येऊ दिले पाहिजे. कायद्याचा सन्मानही केला पाहिजे, असा सल्लाही अमित शाह यांनी दोन्ही नेत्यांना आणि अन्य काँग्रेस नेत्यांना दिला आहे.

Congress chose this day for protest and wore black clothes because they want to give a subtle message

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात