कोविडमधून बरे झाला असाल तरी कोविड प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घ्या; एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरियांचा सल्ला

वृत्तसंस्था

नवी दिल्ली – तुम्हाला कोविड होऊन तुम्ही त्या संक्रमणातून बरे झाला असलात, तरी कोविड प्रतिबंधक लसीचे तुम्ही दोन्ही डोस घ्या, असा महत्त्वाचा वैद्यकीय सल्ला दिल्लीच्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्ससेसचे (एम्स) संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी भारतीयांना दिला आहे. The current recommendation is that, if you have recovered from COVID then you should take both doses of vaccine, says AIIMS Director Dr. Randeep Guleria

या सल्ल्याचा नेमका वैद्यकीय अर्थही डॉ. गुलेरिया यांनी समजावून सांगितला आहे. ते म्हणतात, की कोविड संक्रमणामधून बरे झाल्यानंतरही कोविड प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेणे म्हणजे priming आहे. म्हणजे हा प्राथमिक डोस आहे. तर दुसरा डोस हा booster म्हणजे तुमची प्रतिकार शक्ती वाढविणारा आहे.कोविड संक्रमणापासून वाचण्यासाठी हे दोन्ही डोस घेणे उपयुक्त आणि महत्त्वाचे आहे, असेही डॉ. गुलेरिया यांनी स्पष्ट केले आहे. सध्या कोविड पेशंटची वाढती संख्या पाहता हा वैद्यकीय सल्ला असल्याचेही त्यांनी सांगितले.

The current recommendation is that, if you have recovered from COVID then you should take both doses of vaccine, says AIIMS Director Dr. Randeep Guleria

महत्त्वाच्या बातम्या