कोरोनाची सौम्य लक्षणं असल्यास सिटी स्कॅनचा फायदा नाही ; डॉ. रणदीप गुलेरिया यांचा इशारा


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : ” कोरोनाची सौम्य लक्षणं असतील तर सिटी स्कॅन करण्याचा काहीच फायदा नाही. एक सिटी स्कॅन तीनशे छातीच्या एक्स-रे इतकं असतं आणि हे खूप हानिकारक आहे,” असा इशारा एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिला. CT scan is of no use if the corona has mild symptoms

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लक्षणं असूनही RT-PCR टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर CT-SCAN करण्याकडे लोकांचा कल वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.



कोरोनाचा विषाणू RT-PCR टेस्टलाही चकवा आणि त्याचे निदान न झाल्याची काही प्रकरणे दिसून आली. त्यामुळे सिटी स्कॅनमध्ये कोरोना असल्याचं निदान होत असल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर अनेक जण CT-SCAN करून घेत आहेत. पण सिटी स्कॅन करणं महागात पडू शकतं, असा इशारा त्यांनी दिला.

डॉ. गुलेरिया यांनी सांगितलं, “सौम्य लक्षणं असतील तर सिटी स्कॅन करण्याचा काहीच फायदा नाही.   एक सिटी स्कॅन तीनशे छातीच्या एक्स-रे इतकं असतं आणि हे खूप हानिकारक आहे.”
सौम्य लक्षणं असलेले रुग्ण कोणत्याही औषधांशिवाय बरे होऊ शकतात. पण मध्यम लक्षणं असलेल्या रुग्णांना स्टेरॉईड घेण्याची गरज आहे. पण तेसुद्धा डॉक्टरांच्या सल्लानुसारच घ्यावं, असंही डॉ. गुलेरिया म्हणाले.

CT scan is of no use if the corona has mild symptoms

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात