Vaccination : कॉंग्रेसशासित ३ राज्यांचा १ मेपासून लसीकरणास नकार, लसीच्या तुटवड्याचे दिले कारण

Vaccination Congress-ruled 3 states refuse to vaccinate from May 1, citing shortage of vaccine

Vaccination : देशात कोरोना महामारीची दुसरी लाट अत्यंत वेगवान आहे. यामुळे मोठ्या संख्येने बाधित रुग्ण आढळत आहेत. कोरोनाला आळा घालण्यासाठी लसीकरण सर्वात प्रभावी माध्यम असल्याने केंद्र सरकारने दि. १ मेपासून लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा केली आहे. परंतु, काँग्रेस शासित राज्ये आणि केंद्र सरकारमध्ये तिसऱ्या टप्प्यावरून वाद सुरू झाला आहे. Vaccination Congress-ruled 3 states refuse to vaccinate from May 1, citing shortage of vaccines


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशात कोरोना महामारीची दुसरी लाट अत्यंत वेगवान आहे. यामुळे मोठ्या संख्येने बाधित रुग्ण आढळत आहेत. कोरोनाला आळा घालण्यासाठी लसीकरण सर्वात प्रभावी माध्यम असल्याने केंद्र सरकारने दि. १ मेपासून लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा केली आहे. परंतु, काँग्रेस शासित राज्ये आणि केंद्र सरकारमध्ये तिसऱ्या टप्प्यावरून वाद सुरू झाला आहे.

दि. 1 मेपासून देशात 18 वर्षांवरील सर्वांना लसीकरणाची मुभा केंद्र सरकारने दिली आहे. एवढेच नाही, तर राज्यांना तसेच खासगी संस्थांना लस विकत घेण्याचीही सूट दिली आहे. परंतु काँग्रेस शासित राजस्थान, छत्तीसगड आणि पंजाब या राज्यांनी लसीच्या कमतरतेचे कारण देत लसीकरणाचा तिसरा टप्पा राबवण्यास नकार दिला आहे.

राजस्थानचे आरोग्यमंत्री वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना म्हणाले की, 1 मेपासून सुरू होणाऱ्या 18 वर्षांवरील सर्वांसाठी लसीकरण मोहिमेच्या आधी आम्ही सीरम इन्स्टिट्यूटशी लसींच्या पुरवठ्याबाबत बोलणी केली. सीरमने आम्हाला सांगितले की, केंद्र सरकारने दिलेल्या ऑर्डर पूर्ण करण्यासच आम्हाला 15 मे उजाडणार आहे. त्यामुळे त्या आधी आम्ही राजस्थानला लस पुरवू शकणार नाही.

तथापि, केंद्र सरकार लस निर्मात्यांकडून लस खरेदी करून ती राज्यांना मोफतच उपलब्ध करून देणार आहे. लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी केंद्र सरकारने याआधीच देशातील दोन्ही लस उत्पादकांना सीरम आणि भारत बायोटेक यांना पुढील ऑर्डरची रक्कम आधीच देऊन टाकली आहे. याचा वापर करून दोन्ही कंपन्यांनी आपल्या लस उत्पादन क्षमतेत वाढ केली आहे. भारत बायोटेकने तर आपल्या बंगळुरू प्रकल्पात वाढीव सुविधा आणून वार्षिक 70 कोटी डोस निर्मितीची क्षमता केल्याचे सांगितले आहे.

Vaccination Congress-ruled 3 states refuse to vaccinate from May 1, citing shortage of vaccines

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात