धक्कादायक, पुष्पक एक्सप्रेसमध्ये दरोडा, प्रवासी महिलेवर बलात्कार


पुष्पक एक्सप्रेसवर दरोडा टाकणाऱ्या दरोडेखोरांनी प्रवासी महिलेवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. सात ते आठ दरोडेखोरांनी धावता ट्रेनमध्ये प्रवाशांना लुटण्याची घटना समोर आली आहेShocking, robbery in Pushpak Express, rape of a traveling woman


विशेष प्रतिनिधी

कल्याण : पुष्पक एक्सप्रेसवर दरोडा टाकणाऱ्या दरोडेखोरांनी प्रवासी महिलेवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. सात ते आठ दरोडेखोरांनी धावता ट्रेनमध्ये प्रवाशांना लुटण्याची घटना समोर आली आहे.
इगतपुरी ते कसारा दरम्यान लखनऊ-मुंबई पुष्पक एक्सप्रेसमध्ये ही घटना घडली. कल्याण रेल्वे पोलिसांनी तीन दरोडेखोरांना ताब्यात घेतले आहे. इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

शुक्रवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास पुष्पक एक्सप्रेस इगतपुरी स्टेशनला पोहोचली. मुंबई दिशेने येत असताना इगतपुरी स्थानक सोडल्यानंतर ट्रेन बोगद्याजवळ पोचली. त्यावेळी ट्रेन स्लो झाल्याने सात ते आठ जण ट्रेनमध्ये चढले. त्यांनी प्रवाशांना मारहाण करण्यास सुरुवात केली. हे सर्व दरोडेखोर प्रवाशांकडून मोबाईल आणि पैसे हिसकावून घेत होते. प्रतिकार करणाऱ्या प्रवाशांना त्यांनी बेदम मारहाण करायला सुरुवात केली .

दरोडेखोरांचा हातात फाइटर आणि बेल्ट होता. अनेक प्रवाशांना या दरोडेखोरांनी लुटले. मात्र 15 ते 20 प्रवासी सध्या समोर आले आहेत. एका प्रवाशी महिलासोबत दरोडेखोरांनी छेडछाड सुरू केली. वीस वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. काही धाडसी प्रवाशांनी दोन दरोडेखोरांना पकडून ठेवले. ट्रेन कल्याण स्थानकात येताच पोलिसांनी या दरोडेखोरांना आपल्या ताब्यात घेतले.

Shocking, robbery in Pushpak Express, rape of a traveling woman

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*