बाळासाहेब कुरणे आणि सुरेश लोंढे अशी या अटक केलेल्या आरोपींची नावं आहे. बाळासाहेब कुरणे यांचा सुरेश लोंढे जावई आहे.Accused arrested for calling bomb in Ambabai temple
विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : गुरुवारी अंबाबाई मंदिर परिसरात बॉम्ब ठेवल्याचा एक निनावी फोन आल्यानं एकच खळबळ उडाली होती.निनावी फोन करणाऱ्या संशयित व्यक्तींना कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बाळासाहेब कुरणे आणि सुरेश लोंढे अशी या अटक केलेल्या आरोपींची नावं आहे. बाळासाहेब कुरणे यांचा सुरेश लोंढे जावई आहे.
या प्रकरणात पोलिसांनी अवघ्या काही तासातच आरोपींना अटक केली.हे दोन्ही आरोपी कोल्हापूर जिल्ह्यातील वडगावचे रहिवासी आहेत.दरम्यान सुरेश लोंढे याला वडगावमधून तर सासरा बाळासो कुरणे याला सांगली जिल्ह्यातून अटक केली.
त्यानंतर आरोपींना कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे आणण्यात आले. या दोघांच्यावर राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय. अशी माहिती कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
ज्या नंबरवरून कॉल केला तो फोन बाळासो कुरणे या व्यक्तीच्या नावावर होता . पण हा मोबाइल जावई सुरेश लोंढे वापरत होता. आरोपीकडे कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.दारुच्या नशेत जावयाने फोन केल्याचा दावा सासऱ्यांनी केलाय.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App