महाराष्ट्रात शिवसेना –राष्ट्रवादी काँग्रेसला संपवायला निघालेत; काँग्रेस महासचिव विश्वबंधू राय यांचे हायकमांडला पत्र


विशेष प्रतिनिधी

मुंबई : शिवसेनेने राष्ट्रवादीशी संगनमत करून महाराष्ट्रातून काँग्रेसला संपविण्याचा डाव रचला आहे, अशी ठाकरे – पवार सरकारवर घणाघाती टीका कारणारे पत्र मुंबई काँग्रेसचे महासचिव विश्वबंधू राय यांनी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांना लिहिले आहे. या पत्रामुळे राज्यात मारून मुटकून सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडीतील मतभेद या पत्राच्या रूपाने पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. shivsena – NCP conspired to distroy congress in maharashtra, says congress gen. secretary vishwabandhu rai

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने हातमिळवणी करून काँग्रेसला राज्यातून नामशेष करण्याचा डाव रचला आहे राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर भविष्यात आघाडीत राहणे काँग्रेसला परवडणारे नाही; असा धोक्याचा इशाराही त्यांनी दिला.

मुंबई काँग्रेसचे महासचिव आणि माजी खासदार संजय निरुपम यांचे विश्वबंधू राय हे निकटवर्तीय मानले जातात. ते पत्रात म्हणतात, काँग्रेसला राज्यातून नामशेष करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. प्रत्येक मोर्चावर प्रत्येक वेळी याची प्रचिती येत आहे.

काँग्रेसला नामशेष करण्याचे षडयंत्र

2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. महाविकास आघाडीत काँग्रेसची कुचंबणा होत आहे. काँग्रेसला दाबण्याचा प्रयत्न शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते करत आहेत. त्यामुळे पक्षाने आघाडीत राहणे भविष्यात घोडचूक ठरेल, असा इशारा त्यांनी दिला.

shivsena – NCP conspired to distroy congress in maharashtra, says congress gen. secretary vishwabandhu rai

काँग्रेसला महाविकास आघाडीत मान नाही

महाविकास आघाडीतील काँग्रेसचे मंत्र्यांनीही वारंवार महाविकास आघाडी सरकार आमचा मान राखत नाही आणि महत्वही देत नाही, असे सांगितले आहे. त्यामध्ये काही कॅबिनेट मंत्र्याचा समावेश आहे. शिवसेनेचे मुखपत्र सामनातील अग्रलेखात काँग्रेस हायकमांड आणि काँग्रेसचे वाभाडे काढले होते. त्यामुळे ठाकरे – पवार सरकारला काँग्रेसशी काही देणे घेणे नाही, असे स्पष्ट होत आहे, असे पत्रात म्हंटले आहे.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात