भाजपला पराभूत करण्याच्या इर्षेने कोणाला महापौर केले पाहा…जेसिका लाल हत्याकांडातील आरोपीची आई अंबालाच्या महापौरपदी


वृत्तसंस्था

अंबाला : शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हरियाणातील स्थानिक निवडणूकांमध्ये भाजपला पराभूत करण्याच्या जिद्दीने काँग्रेसने कोणाला निवडून आणलेय पाहा… जेसिका लाल हत्या प्रकरणातील आरोपी मनू शर्माची आई शक्ती राणी शर्मा या अंबालाच्या महापौर होणार आहेत. shakti rani sharma mother of manu sharma accused in jesica lal murder case wins mayoral election in ambala

सध्या त्या हरयाणा जनचेतना पार्टीच्या वतीने महापौर होणार असल्या तरी त्या माजी काँग्रेस नेते, माजी केंद्रीय मंत्री विनोद शर्मा यांच्या पत्नी आहेत. जेसिका लाल हत्याकांड प्रकरणामध्ये दोषी ठरवण्यात आलेला मनू शर्मा हा या दोघांचाच मुलगा आहे. त्यांनी आठ हजार मतांच्या फरकाने निवडणूक जिंकली आहे.

shakti rani sharma mother of manu sharma accused in jesica lal murder case wins mayoral election in ambala

अंबाला, पंचकूला, सोनीपत, रेवारीमधील धरुहेरा, रोहतकमधील सांपला आणि हिस्सारमधील उकालनामध्ये रविवारी महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी मतदान झाले. काँग्रेसने सोनीपमध्ये १४ हजार मतांनी विजय मिळवला. निखिल मदान हे सोनीपतचे महापौर म्हणून कायम राहणार आहेत. काँग्रेसने शेतकरी आंदोलनामुळे जनतेत असलेल्या संतापामुळे भाजपाचा पराभव झाल्याचा दावा केला आहे. पण हे करताना हत्याकांडातील आरोपीच्या घरात सत्ता गेली आहे.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात