लाचखोर डीवायएसपीचे निलंबन झाले म्हणून शिवराजची अमानुष मारहाण समजली


जालन्यातील रुग्णालयात पोलिस एका निशःस्त्र तरुणाला अमानुष मारहाण करत असल्याचा व्हिडीओ गेल्या दोन दिवसांपासून व्हायरल झाला आहे. गयावया करणाऱ्या तरुणाला सात-आठ पोलिस मारत आहेत हे पाहून कोणच्याही मनात पोलिसांबद्दल संताप निर्माण होईल. चीड आणणारी बाब म्हणजे मारहाण करणारा खाकी वर्दीतल्या एका पोलिसाला लाचखोरीच्या आरोपात निलंबीत करण्यात आले आहे. हाच लाचखोर वर्दीचा माज दाखवत होता. या दोषींविरोधात कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. Shivraj’s inhuman beating was understood only when the corrupt DYSP was suspended, Leader of Opposition Devendra Fadanvis demands suspension of guilty Poilce


प्रतिनिधी

मुंबई  : जालना येथील भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस शिवराज नारियलवाले यांना झालेल्या अमानूष मारहाणीच्या प्रकरणात दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करण्याची मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे.

नारियलवाले यांना 9 एप्रिल 2021 रोजी जालन्यातील दीपक हॉस्पिटलमध्ये गणवेशातील 6 आणि गणवेशात नसलेल्या दोन पोलिसांनी अमानुष मारहाण केली होती. मात्र पोलिसांच्या प्रचंड दहशतीमुळे सुमारे दीड महिने नारियलवाले कुटुंब तोंड उघडू शकले नाही. मारहाणीचा व्हिडीओ बाहेर न आणण्याची धमकी त्यांना पोलिसांनी दिली होती. मात्र मारहाण प्रकरणाशी संबंधित एक डीवायएसपी स्वतःच अ‍ॅट्रोसिटीच्या एका प्रकरणात लाच घेताना सापडला. त्याचे निलंबन झाल्यामुळे नारियलवाला कुटुंबाला थोडा धीर आला आणि दीड महिन्यांनी त्यांनी हा व्हिडीओ जगासमोर आणला.अन्यथा हा प्रकारही कधीच उघडकीस आला नसता.

फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे की, राज्यात कायद्याचे राज्यच नसल्याप्रमाणे अशा घटना घडत आहेत. त्यावर सरकारचे मौन हे तर अधिकच गंभीर आहे. विशेषत: राज्य सरकारविरोधात भाजपाचे कार्यकर्ते अथवा कुणी सामान्य माणसाने सुद्धा काही प्रतिक्रिया समाजमाध्यमांवर दिली तर अशा व्यक्तींना कधी पोलिसांकडून तर कधी राजकीय कार्यकर्त्यांकडून मारहाणीचे प्रकार अलिकडच्या काळात प्रचंड वाढले आहेत. कायद्याचा धाकच उरलेला नाही. आपण स्वत: या प्रकरणात लक्ष घालून दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे. 

शिवराज नारियलवाले यांना 9 एप्रिलला जालन्यातील दीपक हॉस्पिटलमध्ये झालेल्या रानटी मारहाणीचा व्हीडिओ समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाला आहे. शिवराज हे 9 एप्रिलला दीपक हॉस्पिटलमध्ये आपल्या बहिणीला उपचारासाठी घेऊन गेले होते. त्याच सुमारास गवळी समाजाच्या एका युवकाचा अपघाती मृत्यू तेथे झाला आणि त्यामुळे काही लोक तेथे धुडघूस घालत होते. त्यावेळी उपस्थित काही पोलिसांनी गवळी समाजाबद्दल अर्वाच्य शिविगाळ केली. शिवराज यांनी पोलिसांची ही शिविगाळ आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केली. आपल्या समाजाबद्दल इतक्या आपत्तीजनक शब्दात कुणी बोलत असेल तर त्याचे चित्रीकरण करणे एवढाच काय तो त्यांचा गुन्हा, असे फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. पण, त्यावरुन गणवेशातील 6 आणि गणवेशात नसलेल्या 2 अशा आठ पोलिसांनी शिवराज यांना घेरून त्यांना अमानूष मारहाण केली.

विशेष म्हणजे रूग्णालयात धुडगूस घालणाऱ्या अज्ञात आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. म्हणजे नारियलवाले यांचा त्यात समावेश नव्हता. त्यांनी केवळ ती शिविगाळ कॅमेराबद्ध केली, म्हणून संतापाच्या भरात कायद्याच्या रक्षणाची जबाबदारी ज्यांच्या हातात आहे, त्यांनीच कायदा हाती घेतलेला दिसून येतो. यात डीवायएसपी पदावरील व्यक्तीचाही समावेश असणे, हे तर आणखी गंभीर आहे. जर नारियलवाले यांचा कुठे दोष असेल तर गुन्हा दाखल करून रितसर कारवाई पोलिसांना करता आली असती. पण, सराईत गुन्हेगाराला सुद्धा मारहाण करण्यात येत नाही, अशा पद्धतीने नारियलवाले यांना मारहाण करण्यात आल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.

Shivraj’s inhuman beating was understood only when the corrupt DYSP was suspended, Leader of Opposition Devendra Fadanvis demands suspension of guilty Poilce

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय