बहुमताचा आकडा नसेल तर बोलून व डोलून काय होणार? असा सवाल करत कॉँग्रेसला स्वबळाच्या मरणाने मरून देत एकत्र लढण्याचा मास्टर प्लॅन शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसने आखला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्येच याबाबतची भूमिका मांडली आहे. कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या स्वबळावर लढण्याच्या इच्छेला त्यामुळेच फुंकर घातली जात आहे. Shiv Sena-NCP master plan to fight together by letting Congress die by its own death
विशेष प्रतिनिधी
मुंबई : बहुमताचा आकडा नसेल तर बोलून व डोलून काय होणार? असा सवाल करत कॉँग्रेसला स्वबळाच्या मरणाने मरून देत एकत्र लढण्याचा मास्टर प्लॅन शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसने आखला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्येच याबाबतची भूमिका मांडली आहे. कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या स्वबळावर लढण्याच्या इच्छेला त्यामुळेच फुंकर घातली जात आहे.
स्वबळावर लढून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करणे यात चुकीचे काय आहे? भाजप व काँग्रेससारखे पक्ष त्या दिशेने तयारी करत आहेत हे चांगलंच झाले. आता महाराष्ट्रात राहता राहिले शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोनच पक्ष. सगळेच स्वबळावर लढत असतील तर या दोन प्रमुख पक्षांना महाराष्ट्र हिताचा विचार करुन एकत्र लढावे लागेल व त्याचे सूतोवाच उद्धव ठाकरे व शरद पवार यांनी केलंच आहे, अशी भूमिका सामनातून मांडण्यात आली आहे. सामनाच्य अग्रलेखात म्हटले आहे की, महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले हे एक झुंजार नेते आहेत. त्यांनीही आता आगामी निवडणुका स्वबळावर लढून महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता आणण्याची गर्जना केली आहे. स्वबळावर सत्ता आणू व काँग्रेसचा मुख्यमंत्री स्वबळावर करू, असे त्यांनी आत्मविश्वासाने जाहीर केले आहे. मुख्यमंत्री कोण, हा संभ्रम त्यांच्या मनात दिसत नाही.
मुख्यमंत्री मीच, पक्षाने परवानगी दिली तर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आपण बनण्यास तयार असल्याचे विधानही त्यांनी केले आहे. त्यामुळे नाना पटोले हे २०२४ साली महाराष्ट्राच्या गादीवर काँग्रेसचा मुख्यमंत्री बसवल्याशिवाय राहणार नाहीत हे आता नक्की झाले आहे. मात्र, २०२४चा हवाला आता कोणीच देऊ नये ज्याच्यापाशी १४५ आमदारांचे बहुमत आहे त्याचे सरकार बनेल व त्यांचा मुख्यमंत्री होईल. संसदीय लोकशाही हा बहुमताच्या आकड्यांचा खेळ आहे. हा खेळ ज्याला जमेल तो गादीवर बसेल. पण शेवटी बहुमताचा आकडा नसेल तर बोलून व डोलून काय होणार? असे मत नानांच्या विधानावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले आहे, तेही खरेच आहे.
नाना पटोले यांना न दुखावता उलट त्यांच्यातील स्वबळाची इच्छा आणखी जागृत करण्याचेही शिवसेनेने ठरविल्याचे दिसत आहे. त्यामुळे शिवसेनेने म्हटले आहे की, नाना पटोले यांचा पक्ष महाराष्ट्रात सत्तेत आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस हा महत्त्वाचा घटक आहे, पण महाराष्ट्रात त्यांचा पक्ष आज तिसऱ्या स्थानावर असल्याने स्वबळाची गर्जना करून नाना पटोलेंनी पक्षातील कार्यकर्त्यांत आत्मविश्वास निर्माण केला.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App