शिवसेना मुंबईची दादा : बाळासाहेबांच्या जे नजरेच्या जरबेत होते, ते संजय राऊतांना तोंडाने का सांगावे लागते??


शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत सध्या प्रचंड अस्वस्थ आणि संतापलेले दिसत आहेत. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने कायदेशीर कारवाईचा फास आवळणे चालवले आहे तस-तशी संजय राऊत यांची अस्वस्थता वाढलेली दिसत आहे. त्यातून त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या नेत्यांपासून ते ईडीपर्यंत टीकेच्या तोफेचा भडीमार केला आहे. अशा टीकेचा भडीमार करण्याचा लोकशाहीत त्यांना 100% अधिकार आहे. किंबहुना कोणत्याही विषयावर आपले मत ठासून मांडण्याचा त्यांचा अधिकार आणि वकूब आहे.Shiv Sena Mumbai’s grandfather: Why does Sanjay Raut have to tell the story of Balasaheb

पण आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी जे एक वक्तव्य केले आहे, त्याविषयी मात्र काही शंका मनात आल्यावाचून राहत नाहीत. “आमच्यावर दादागिरी करता काय? ही मुंबई आहे आणि मुंबईत शिवसेनाच दादा आहे…!!”, हे संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत विधान केले आहे.गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत यांचा एक प्रॉब्लेम झाला आहे. त्यांना प्रत्येक गोष्ट आपल्या तोंडाने सांगावी लागत असल्याचे दिसत आहे.



संजय राऊत यांनी मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या नेतृत्वाची भलामण करताना ते “राष्ट्रीय नेते” आहेत. या देशात अनेक नेते हिमालयाच्या उंचीचे होते. परंतु, ते पंतप्रधान पदापर्यंत पोहोचू शकले नाहीत. तरी त्यांची उंची कमी होत नाही. शरद पवार हे असेच फार मोठ्या उंचीचे नेते आहेत, असे वक्तव्य केले होते. आता प्रश्न हा आहे की संजय राऊत यांच्यासारख्या नेत्यांना शरद पवार यांची “राजकीय उंची” नेहमीच का सांगावी लागते?? ते “राष्ट्रीय” पातळीवरचे नेते आहेत, असे वारंवार का म्हणावे लागते??

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा हे भाजपचे “राष्ट्रीय नेते” आहेत, असा आवर्जून उल्लेख कोणी भाजपचा नेता सध्या करताना दिसत नाही. अगदी सध्या भारताच्या राजकीय पटलावरून पूर्णपणे दूर झालेले पण एके काळी देशात अत्यंत प्रभावी असलेले डाव्या कम्युनिस्ट पक्षांचे नेते सीताराम येचुरी आणि प्रकाश कारत हे “राष्ट्रीय पातळी”वरील नेते आहेत, असे कोणी सांगण्याची गरज पडत नाही… मग संजय राऊत यांच्यासारख्या नेत्यांना शरद पवार यांची राजकीय उंची “राष्ट्रीय पातळी”वरची आहे, असे वारंवार का बोलावे लागते??

आजही त्याच प्रमाणे त्यांनी जे विधान केले आहे, त्याची चिकित्सा करता येईल. “शिवसेना ही मुंबईची दादा आहे,” असे स्व. बाळासाहेब ठाकरे यांना कधीही स्वतःच्या तोंडाने सांगावे लागले नाही. बाळासाहेबांची अनेक विधाने वादग्रस्त ठरली. देशात राजकीय हलकल्लोळ झाला. पण त्यांनी कधी, “शिवसेना मुंबईची दादा आहे”, असे वक्तव्य केल्याचे ऐकिवात नाही. तर शिवसेनेची सगळी दादागिरी बाळासाहेबांच्या नजरेच्या जरबेत दिसायची…!! बाळासाहेबांनी शरद पवारांना, “तुमचा दाऊद तर आमचा गवळी”, असे सुनावले होते.

भाजपला, “तुम्ही देशात तर आम्ही महाराष्ट्रात”, असे सुनावले होते. इतकेच काय पण आपण मुंबईचे अनभिषिक्त सम्राट आहोत हे बाळासाहेबांनी स्वतःच्या तोंडून कधी सांगण्याची गरज पडली नव्हती… तर मातोश्रीवर सर्व क्षेत्रातल्या मंडळींचा राबता हे निमुटपणे सांगून जायचा…!! बडे – बडे आणि भले – भले लोक मातोश्रीवर बाळासाहेबांच्या भेटीला येऊन जायचे. त्यात मायकल जॅक्सन यांच्यापासून ते प्रणव मुखर्जींपर्यंत अनेक हिमालयाच्या उंचीच्या माणसांचा समावेश होता. मातोश्रीवर अडवाणी यायचे. शरद पवार यायचे. प्रख्यात व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांचा अपवाद सोडला तर बाळासाहेब कधी कुणाला घरी जाऊन भेटले नाहीत. त्यांना कधी “मुंबई शिवसेना दादा आहे”, हे तोंडाने सांगण्याची गरज पडली नाही…!!

पण मग आज संजय राऊत यांना शिवसेनेच्या दादागिरीची आठवण करून देण्याची गरज का पडते आहे?? सध्या मातोश्रीवर कोणाचा राबता आहे का?? कुणी तिथे येऊन जाऊन असते का?? कोरोनाचा कालावधी सोडून द्या. कारण तेव्हा सगळीकडेच जाण्या-येण्याची बंदी होती. पण कोरोना नव्हता तेव्हा आणि सध्या नसताना मातोश्रीकडे कोण फिरकतेय का?? कोण कुणाचे मार्गदर्शन घ्यायला मातोश्रीवर जातेय का??

आता मातोश्रीचे मालक “वर्षा”वर बसतात. हरकत नाही. पण तिथे तरी त्यांचे मार्गदर्शन घ्यायला कोण जाते??… आणि म्हणूनच मग संजय राऊत यांना तोंडाने सांगावे लागते का?, की मुंबईत शिवसेनाच दादा आहे…!! मनात शंका आहे. उत्तर कोण देणार…??

Shiv Sena Mumbai’s grandfather: Why does Sanjay Raut have to tell the story of Balasaheb

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात