शरद पवारांची भाटगिरी करत संजय राऊतांच्या पुन्हा काँग्रेसला लाथा


काँग्रेससारख्या ऐतिहासिक वारसा असलेल्या पक्षाला आज वर्षभर पूर्णवेळ अध्यक्ष नाही. यूपीएचे भविष्य काय? हा भ्रम कायम आहे. राहुल गांधी हे वैयक्तिकरीत्या जोरदार संघर्ष करत असतात. पण कुठेतरी काहीतरी कमी आहे.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : चार खासदार असलेल्या आणि राष्ट्रीय म्हणवून घेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भाटगिरी करत सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी पुन्हा एकदा काँग्रेसला लाथा झाडल्या आहेत. sharad pawar sanjay raut latest news

संयुक्त पुरोगामी लोकशाही आघाडीच्या अध्यक्षपदी शरद पवार यांची नियुक्ती व्हावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. काँग्रेसचे अध्यक्षपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकी असल्याचीही बोचरी टीका त्यांनी केली आहे.

काँग्रेससारख्या ऐतिहासिक वारसा असलेल्या पक्षाला आज वर्षभर पूर्णवेळ अध्यक्ष नाही. यूपीएचे भविष्य काय? हा भ्रम कायम आहे. राहुल गांधी हे वैयक्तिकरीत्या जोरदार संघर्ष करत असतात. पण कुठेतरी काहीतरी कमी आहे. मोदी-शहांसमोर विरोधी पक्ष कुचकामी दिसत आहे. यूपीएची जबाबदारी शरद पवारांवर सोपवावी असे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.

अग्रलेखात पुढे म्हटले आहे की, नुकतीच बिहारची विधानसभा निवडणूक झाली. त्यातही काँग्रेसची घसरगुंडी उडाली. हे सत्य झाकता येणार नाही. तेजस्वी यादव या तरुणाने जी झुंज दिली ती जिद्द काँग्रेस नेतृत्वाने दाखवली असती तर बिहारचे चित्र कदाचित बदलले असते. लोकशाहीचे सध्या जे अध:पतन सुरू आहे त्यास भारतीय जनता पक्ष किंवा मोदी-शहांचे एककल्ली सरकार जबाबदार नसून निपचित पडलेला विरोधी पक्ष सर्वाधिक जबाबदार आहे. सद्य:स्थितीत सरकारला दोष देण्यापेक्षा विरोधकांनी आत्मचिंतन करणे गरजेचे आहे. विरोधी पक्षालाही एक सर्वसामान्य नेतृत्व असावे लागते.

सरकारवर तुटून पडण्यात काँग्रेस कमजोर पडली आहे असे म्हणून अग्रलेखात म्हटले आहे की, राहुल गांधींच्या विधानांना काँग्रेसही गांभीर्याने घेत नाही, असे कृषी मंत्री नरेंद्र तोमर म्हणाले. आपल्या सर्वोच्च नेत्यांची अशी जाहीर चेष्टा करण्याचे धारिष्ट सत्ताधारी का दाखवतात यावर काँग्रेसने वर्किंग कमिटीत चर्चा करणे गरजेचे आहे. मात्र तरीही सरकारवर तुटून पडण्यात काँग्रेस कमजोर पडली आहे, हा आक्षेप उरतोच. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली एक यूपीए नामक राजकीय संघटन आहे. त्या यूपीएची अवस्था एखाद्या एनजीओप्रमाणे झाल्याचे दिसत आहे.

यूपीएतील घटक पक्षांनीही देशांतर्गत शेतकऱ्यांचा असंतोष फारशा गांभीर्याने घेतलेला दिसत नाही. यूपीएमध्ये काही पक्ष असावेत. पण ते नक्की कोण व काय करतात, याबाबत संभ्रम आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला तर यूपीएतील इतर घटक पक्षांची साधी सळसळही जाणवत नाही.

sharad pawar sanjay raut latest news

केंद्रीय सत्तेच्या जोर जबरदस्तीवर ममतांचा पक्ष फोडण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा देशातील विरोधी पक्षाने एक होऊन ममतांच्या पाठी उभे राहणे गरजेचे आहे; पण या काळात ममता यांची फक्त शरद पवार यांच्याशीच थेट चर्चा झालेली दिसते व पवार आता पश्चिम बंगालात जात आहेत. हे काम काँग्रेसच्या नेतृत्वाने करणे गरजेचे आहे, असेही म्हटले आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात