विशेष प्रतिनिधी
मुंबई : ज्येष्ठ नेते शरद पवार (sharad pawar prime minister news ) यांना आज 80 व्या वर्षात ज्या पदावर पाहायचे आहे ते आपण अजून पाहू शकलेलो नाही. महाराष्ट्राने ठरवून साथ दिली, 48 खासदार शरद पवारांच्या मागे का उभे राहू शकले तर हे शक्य होऊ शकते, असा राजकीय आशावाद राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला आहे. पटेलांनी आज इंग्रजी दैनिक हितवादसह अनेक वर्तमानपत्रांमध्ये लिहिलेल्या लेखांमध्ये शरद पवार यांच्या पंतप्रधानपदाविषयी भाष्य केले आहे.
या लेखात प्रफुल्ल पटेल म्हणतात, की बंगालमध्ये ममता बॅनर्जींचे 36 खासदार निवडून येऊ शकतात. आंध्रात जगनमोहन रेड्डी यांचे 28 खासदार निवडून येऊ शकतात तर महाराष्ट्रातील 48 खासदार शरद पवारांच्या मागे का उभे राहू शकत नाहीत? शरद पवारांचा 85 वा वाढदिवस साजरा करू त्यावेळी आपले स्वप्न साकार झाले पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही आम्ही आणि महाराष्ट्रात पवारांवर प्रेम करणाऱ्या महाराष्ट्राने त्यांच्या पाठिशी उभे राहिले पाहिजे. sharad pawar prime minister news
शरद पवारांनी महाराष्ट्रातून काँग्रेसला दिलेली ताकद पाहता तेच पंतप्रधानपदाचे उमेदवार होते पण दिल्लीच्या “दरबारी” राजकारणामुळे ही संधी हुकली. यात त्यांच्यासह काँग्रेस आणि देशाचे मोठे नुकसान झाले. 1996 साली शरद पवार पंतप्रधान असणारे काँग्रेस सरकार बनले असते पण नरसिंह राव यांच्यामुळे देवेगौडा सरकार आले, असा दावा प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे.
प्रफुल्ल पटेल लेखात म्हणतात
काँग्रेसची काम करण्याची पद्धत ‘सुनियोजित बंड’ घडवून आणण्याची आणि आपल्याच पक्षातील प्रादेशिक नेतृत्वाला कमजोर करण्याची राहिली आहे. याचा पहिला फटका पवारांना 1989 ला बसला. आर. के. धवन, माखनलाल फोतेदार यांनी षडयंत्र केले. पण तो प्रयत्न पवारांनी फोल ठरवला.
राजीव गांधींच्या हत्येनंतर फक्त शरद पवारांना दूर ठेवणे या एका अजेंड्यासाठीच नरसिंह राव यांना नेतृत्वपदी आणले गेले. देशभरातील काँग्रेसजनांना पवारांचे नेतृत्व हवे होते. 1996 मध्ये पवार पंतप्रधान असणारे सरकार काँग्रेस बनवू शकत होती. पण फक्त नरसिंह रावांमुळे देवेगौडांचे सरकार बनले. माझ्या घरातून ह्या घडामोडी होत होत्या, त्यामुळे मी हे अधिकार वाणीने सांगू शकतो.
सीताराम केसरींनी देवेगौडांचा पाठिंबा काढून घेतला त्या वेळी इंद्रकुमार गुजराल पंतप्रधान झाले. तेव्हा पवारांनी स्वतःच्या महत्वाकांक्षांचा गळा पक्षासाठी दाबला. सॉफ्ट स्टँड घेतला आणि अगदी सोपे असलेले पंतप्रधानपद सोडले हे आम्ही बघितले आहे. 13 दिवसात पडलेले वाजपेयी सरकार फक्त पवारांमुळे पडले. पण तरीही त्यांना मिळायला हवे होते ते स्वातंत्र्य काँग्रेसने त्यांना दिले नाही. वेगवेगळ्या पध्दतीने काँग्रेसने त्यांचा अपमान केला. पार्लमेंटरी पार्टीचे मुख्य बनवून पवारांना अंधारात ठेवले जायचे.
महाराष्ट्रात आणि केंद्र स्तरावर त्यांच्या नेतृत्वाचा अपमान करणाऱ्या सतत गोष्टी घडविल्या जायच्या. पवार संसदीय दलाचे नेते आणि पी. जे. कुरियन हे पक्ष प्रतोद. कुरियन पवारांना न सांगता नेमणुका परस्पर करायचे. पवारांना त्याची माहितीही नसायची.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App